Anjali Damania : वैभवी देशमुखचा 'तो' व्हिडीओ पाहिला अन् मग लढायचं ठरवलं; बीड प्रकरणात अंजली दमानियांचा ट्रिगर पॉईंट कोणता?
Anjali Damania Majha Katta : अजित पवारांच्या विरोधात सिंचन घोटाळ्याचे सर्व पुरावे फडणवीसांना दिले होते. पण नंतर फडणवीसांनी अजित पवारांना सोबत घेतल्याने धक्का बसल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या.

मुंबई : वडील अतिशय तत्ववादी, म्हाडाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यांच्यापासूनच भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची प्रेरणा मिळाल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितलं. बीड प्रकरणातही वैभवी देशमुखचा एक व्हिडीओ पाहिला आणि तोच धनंजय मुंडे यांच्याविरोधात लढण्याचा ट्रिगर पॉईंट ठरला असंही त्या म्हणाल्या. अंजली दमानिया या एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होत्या.
वैभवी देशमुखचा व्हिडीओ, बीड प्रकरणात लढायचं ठरलं
एखाद्या प्रश्नावर लढण्याची इच्छा का होते, त्यामागे काय प्रेरणा असते असा प्रश्न अंजली दमानिया यांना विचारला. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असेल तर माझ्या मनात एक चलबिचल होते. त्यामुळेच त्याच्याविरोधात लढण्याची उर्जा मिळते. वैभवी देशमुख एकदा टीव्हीवर बोलताना मला ते जाणवलं. तिला डॉक्टर व्हायचं होतं, दहावीला तिला चांगले गुणही मिळाले होते. पण संतोष देशमुखांची हत्या झाली. तिच्या डोक्यावरचं छत गेल्यानंतर मी लढायचं ठरवलं.
वडील म्हाडामध्ये इस्टेट मॅनेंजर होते. त्यावेळी ते अतिशय तत्ववादी होते. म्हाडातील भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अनेकदा खडतर परिस्थितीला सामोरं जावं लागलं. तेव्हापासून लढायची सवय लागली, त्यापासूनच लढण्याची प्रेरणा मिळाली अशी आठवण दमानिया यांनी सांगितली.
केजरीवालांवर आरोप होतोय हे दुर्दैव
इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनानंतर राजकीय पक्ष निर्माण केला पाहिजे असं मी अरविंद केजरीवाल यांना सूचवलं. पण तेवढ्या कमी काळात सगळेच चांगले माणसे कसे मिळतील असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पण नंतर आम आदमी पक्षाची स्थापना झाली असं अंजली दमानिया यांनी सांगितलं. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काही मतभेद असतीलही, पण त्यांनी हॉस्पिटल आणि शिक्षण तसेच इतरांसाठी जे काही काम केलंय त्याच्यावरून त्याची कॉपी केली जाईल असं वाटत होतं. पण ते सोडाच, त्याच्यावरच आरोप केला जातोय हे दुर्दैव आहे असंही दमानिया म्हणाल्या.
काम करत असताना अनेक अडचणी येतात. ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण लढतोय त्यांच्याकडून आपल्याच विरोधात केसेस टाकल्या जातात. त्यामध्ये अनेकदा मोठा खर्च येतो असं दमानिया म्हणाल्या.
भाजपकडून विरोधकांना चिरडलं जातंय
भाजपच्या विरोधात जे कोण उभे राहतील त्यांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. कुणी लढायचा उभं राहिलं तर त्याला इतका त्रास दिला जातोय की त्याने माघार घ्यायला पाहिजे. अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याच्या विरोधात पुरावे दिले. त्याचा संदर्भ घेऊन देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत आवाज उठवला. पण नंतर तेच फडणवीस अजित पवारांना सोबत घेतात त्यावेळी धक्काच बसतो. हे असे कसे करू शकतात असा प्रश्न पडतो.
ही बातमी वाचा :
























