एक्स्प्लोर
Advertisement
'फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेला महारोग', वस्तुस्थिती असली तरी असं म्हणणार नाही : अनिल गोटे
आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनिल गोटे यांनी एक पत्रक जारी करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी केलेली धोकेबाजी, विश्वासघात जगजाहीर आहे. पण एकही धनगर विधानसभेत घेऊ नये यासाठी केलेली कारस्थाने, डावपेच आणि प्रसंगी विरोधकांना बळ देण्याचे त्यांनी केलेले उद्योग मी जाणून आहे. माझ्या मतदारसंघात 'मुसलमान आला तरी चालेल,पण अनिल गोटे येता कामा नये' यासाठी पैशांचा महापूर आला होता. पण मी संतापामध्ये मी कधी फडणवीस 'महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग' असं म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केलं आहे. वस्तुस्थिती असली तरी तसे मी कधी बोलणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनिल गोटे यांनी एक पत्रक जारी करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील कुणीही राजकारणात राहू नये, अशी हलकट, नीच आणि संकुचित बुद्धी फडणवीसांचीच असू शकते, असा आरोप देखील त्यांनी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.आमदार होऊन आठ दिवस झालेत, तोवर पडळकरांना नशा चढली आहे. भारतीय जनता पार्टी आणि पक्षातील उच्चवर्णियांच्या संकुचिपणाची त्यांना अजून पुसटशी ओळखही नाही, असं गोटे यांनी म्हटलं आहे.
गोटे आपल्या पत्रकात म्हणतात, मुनवादी मनोवृत्तीचा मी प्रत्यक्ष बळी आहे. कुत्सीत विचारांच्या, हलकट मनोवृत्तीचे, लबाडी व खोटे बोलण्याचे एकत्रित रुप म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. ते हलक्या कानाचे कारस्थानी आहेत की, शकुनी मामा देखील झक मारेल. प्रारंभीच्या काळात एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध कारस्थान यांनीच रचले. खडसे दाऊदच्या बायकोसोबत फोनवर बोलतात इथपासून सुरु झालेले आरोप त्यांच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचले. नाथाभाऊंची चूक एवढीच की त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती.
गोटे म्हणतात, मी अनेकदा शरद पवारांवर टीका केली. गेली 10 महिने मी त्यांच्याबरोबर काम करत आहे. दिलेल्या शब्दाला जागणे, मनात द्वेष न बाळगणे ही त्यांची विशेषता. शरद पवारांवर प्रेम करणारांची संख्या जेवढी राष्ट्रवादीत आहे त्यापेक्षा दुप्पट लोक अन्य पक्षातील आहेत, जे त्यांच्यावर प्रेम करतात.
पडळकरांनी शरद पवारांना कोरोनाची उपमा दिली. यावरुन त्यांची राजकीय पात्रता, मनाची क्षुद्रता आणि विचारांची पातळी लक्षात येते. पवारांचे वय, अनुभव अन् राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत. डास मारायला कुणी बंदूक वापरत नाही. त्याला हीटचा फवारा पुरेसा असतो, असं गोटे यांनी म्हटलं आहे.
माजी आमदार अनिल गोटे यांचं पत्रक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
क्राईम
राजकारण
Advertisement