राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द देशमुख यांनीच सोशल मीडियावर एक ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द देशमुख यांनीच सोशल मीडियावर एक ट्विट करत याबाबतची माहिती दिली. आपली कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये सांगितलं आहे. याशिवाय मागील काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनाही त्यांनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.
आपली प्रकृती उत्तम असून, लवकरच कोरोनावर मात करुन आपण सेवेत हजर होवू असं म्हणत त्यांनी या संसर्गावर मात करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 5, 2021
Ind Vs Eng : 'उधर से फसेगा तो मजा आएगा...', सोशल मीडियावर गाजतोय पंतनं अश्विनला दिलेला सल्ला
मागील दोन दिवस देशमुख हे जयंत पाटील यांच्यासोबत परिवार संवाद यात्रेत सहभागी झाले होते. यानंतर मुंबईत काही बैठकांनाही त्यांची उपस्थिती होती. शिवाय गुरुवारीही झालेल्या कॅबिनेट बैठकीला त्यांची उपस्थिती होती. त्यामुळं आता देशमुखांच्या संपर्कात आलेल्यांवरही कोरोनाचं सावट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोरोना काळापासून ते अगदी महत्त्वाच्या घटना आणि घडामोडींदरम्यान, देशमुख हे स्वत: पुढाकार घेत काही महत्त्वाचे निर्णय़ घेताना दिसत होते. पोलीस कंट्रोल रुमला भेट देणं असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमाला उपस्थिती असो. देशमुख यांची उपस्थिती पाहायला मिळतच होती. पण, आता पुढील काही दिवस मात्र ते प्रकृतीवर लक्ष देणार असून, कोरोनावर मात करुनच पुन्हा राज्याच्या सेवेत हजर होणार आहेत.