मतदारसंघ सोडून कुठेच न गेलेल्या आव्हाडांनी राज्याच्या नेतृत्वावर टीका करु नये, आनंद परांजपेंचा टोला
आपला मतदारसंघ सोडून जे कुठेही प्रचाराला गेले नाहीत, जे आपल्या मतदारसंघांमध्ये ते अडकून पडले, त्यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वावर चिखलपेक करु नये असा टोला आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला.
Anand Paranjape on Jitendra Awhad : आपला मतदारसंघ सोडून जे कुठेही प्रचाराला जाऊ शकले नाहीत, जे आपल्या मतदारसंघांमध्ये ते अडकून पडले, त्यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वावर चिखलपेक करु नये असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Awhad) लगावला. अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे राजकारण करतात, केवळ कळवा मुंब्रा विधानसभेसाठी मर्यादित नाहीत, असेही परांजपे म्हणाले. जितेंद्र आव्हाड विसरले असतील की ज्या वेळेला त्यांनी राजीनामा दिला होता, त्यावेळीअजितदादा पवार हे साडेतीन तास त्यांच्या बंगल्यावर बसून होते असेही परांजपे म्हणाले.
जितेंद्र आव्हाड हे केवळ एका विधानसभेचे आमदार
जितेंद्र आव्हाड हे केवळ एका विधानसभेचे आमदार म्हणून मर्यादित आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या स्टार प्रचारकाच्या यादीत त्यांचं नाव चौथ्या नंबरवर होतं. पण आपला मतदारसंघ सोडून जे कुठेही प्रचाराला जाऊ शकले नाहीत, आपल्या मतदारसंघांमध्ये ते अडकून पडले, त्यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वावर चिखलपेक करु नये असा टोला परांजपे यांनी आव्हाडांना लगावला. अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे राजकारण करतात, केवळ कळवा मुंब्रा विधानसभेसाठी मर्यादित नाहीत असा टोला देखील परांजपेंनी आव्हाडांना लगावला. जितेंद्र आव्हाड विसरले असतील की ज्या वेळेला त्यांनी राजीनामा दिला होता, त्यावेळीअजितदादा पवार हे साडेतीन तास त्यांच्या बंगल्यावर बसून होते. तिथे पत्रकार परिषद देखील त्यांनी घेतल्याचे परांजपे म्हणाले.
कधीकधी जितेंद्र आव्हाड यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस होतो
कधीकधी जितेंद्र आव्हाड यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस होतो. मागच्या वर्षभरामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या सोयीनुसार ते विसरतात. अजितदादा पवार हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, त्यामुळं जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर बोलणं टाळलं पाहिजे असे परांजपे म्हणाले. अजितदादांनी वेगळे राजकीय भूमिका घेतल्यानंतर या निवडणुकीमध्ये कळवा मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार नजीम मुल्ला हे आव्हाडांसमोर होते. कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये निधी देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील केल्याचे परांजपे म्हणाले. ठाणे महानगरपालिकेतील हद्दीतील सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये त्यांनी निधी दिला. बहुतेक जितेंद्र अव्हाड हे विसरतात की कळवा मुब्रा विधानसभा हा कल्याण लोकसभेचा भाग आहे. ज्याचं नेतृत्व श्रीकांत शिंदे करतात, त्यांच्या माध्यमातून देखील निधी देण्याचं काम करण्यात आलं असल्याचे परांजपे म्हणाले. वित्त व नियोजन खात्यातर्फे अजितदादा पवार साहेबांनी देखील निधी दिला आहे. जर आपल्या मतदारसंघांमध्ये निधी येऊन मतदार संघाचा विकास होतं असेल तर त्यांना पोटसुळ असण्याचे कारणच नाही असा टोलाही परांजपे यांनी आव्हाडांना लगावला. हर्षवर्धन सकपाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल परांजपे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पक्षाने घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही बोलणार नसल्याचे परांजपे म्हणाले.
संतोष देशमुख प्रकरणाची त्रिस्तरीय चौकशी सुरु आहे. अंतिम अव्हाल येत नाही तोपर्यंत पक्षाची हीच भूमिका आहे की ठोस पुरावे समोर येत नाहीत तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांच्यारवर कारवाई नको असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केलं. मागे पक्षाची भूमिका मांडताना मी स्पष्ट केलं होतं की, अंजली दमानिया यांनी स्वतःच कम्प्लेंट, स्वतःच इन्वेस्टीगेटिंग एजन्सी आणि स्वतःच न्याय असं होऊन एखादा व्यक्ती दोषी आहे, अशा निष्कर्षाला येण्याची गरज नाही असे परांजपे म्हणाले. त्यांनी जी कागदपत्र दिलेत ती अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली आहेत. त्यांनी दिलेली कागदपत्रे सत्य आहेत असं देखील मानण्याची गरज नाही असंही परांपजपे म्हणाले. त्या दिलेल्या कागदपत्रांच्या आढावा देखील चौकशी होईल आणि त्यामुळे चौकशीचा अंतिम निर्णय येतो किंवा निष्कर्ष येईपर्यंत त्यांनी देखील थांबावं असे परांजपे म्हणाले. रोज उठून आरोप करण्याची गरज नाही असं मला वाटतं. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला न्यायपालिकेकडे न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यांना देखील तो लोकशाहीमध्ये अधिकर आहे. त्यामुळं त्यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय आहे.
काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये सात जणांची कोर कमिटी स्थापन केली आहे. येणाऱ्या पक्षाच्या बांधणी निमित्ताने पक्षाच्या असलेल्या धोरणाबाबत भविष्यामध्ये पक्षाने कुठले कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवले पाहिजेत, याबद्दल संघटनात्मक बाबींबद्दल त्याचप्रमाणे जनकल्याणाच्या योजना ज्या राबवल्या जातात त्या व्यवस्थित राबवल्या जातात की नाही आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 7 जणांची कमिटीची स्थापना करण्यात आल्याचे परांजपे म्हणाले. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत. राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार प्रफुल पटेल आहेत. प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आहेत. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आहेत. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आहे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आहेत. आगामी निवडणुकांच्या संदर्भात पक्ष संघटनेच्या संदर्भात पक्षाने कुठले कार्यक्रम घेतले पाहिजेत, या संदर्भात वेळोवेळी ही कोर कमिटी बसून पक्षाला पुढे नेण्याचं काम या कमिटीच्या मार्फत होईल असे परांजपे म्हणाले.
आरोप करणाऱ्यांना आम्ही थांबू शकत नाही
अंजली दमानिया यांनी जे जे आरोप केले होते ज्या ज्या चौकशीची मागणी केली होती त्या सर्व चौकशा चालू आहेत. त्यांनी जी जी कागदपत्र अजितदादा पवार दिली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दिली, ही कागदपत्र इन्वेस्टीगेटिंग एजन्सीला पुढे करण्यात आलेली आहेत असे परांजपे म्हणाले. त्याबाबतची त्यांना जे ठोस पुरावे वाटतात त्याबाबत पत्रांच्या आधारे देखील चौकशी चालू आहे. त्यामुळे त्यांनी ज्या ज्या वेळा सरकारकडे गेल्या त्या सर्व मागण्यांवर चौकशी चालू आहे. रोज उठून आरोपच करायचे तर त्याला कोणी आम्ही थांबू शकत नाही असेही परांजपे म्हणाले.
धनंजय देशमुख यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, संरक्षणाशी जबाबदारी ही सरकारची
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या संरक्षणाशी जबाबदारी ही सरकारची आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या केसालाही धक्का लागणार नाही असे परांजपे म्हणाले. पूर्ण संरक्षण त्यांच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे सरकारची भूमिका आहे. त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल आक्षेप असेल तर त्यांनी नक्कीच एसआयटी टीमचे अधिकारी असतील सीआयडी टीमचे अधिकारी असतील यांच्याकडे आक्षेप नोंदवावा. त्याची देखील दखल घेऊन चौकशी करण्याची तयारी सरकारची आहे असे आनंद परांजपे म्हणाले.
महायुतीने घोषित केलेल्या योजना बंद केल्या जाणार नाहीत
अजित पवार यांनी याआधी 10 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. कोरोनासारख्या काळामध्ये देखील राज्याची आर्थिक स्थिती त्यांनी बिघडू दिली नाही. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती कुठेही न बिघडता महायुतीने वचननाम्यामध्ये ज्या ज्या घोषणा घोषित केल्या होत्या या कार्यान्वित ठेवण्याची जबाबदारी महायुतीची असल्याचे परांजपे म्हणाले. तीन तारखेला अधिवेशन सुरू होत आहे. 10 मार्चला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार असल्याचे परांजपे म्हणाले. तोपर्यंत वाट बघावी पण कुठेही महायुतीने घोषित केलेल्या योजना बंद केल्या जाणार नाहीत असे परांजपे म्हणाले. शेवटी महाराष्ट्राला एक सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. राजकीय मतभेद असले तरी ती मांडण्याची एक भाषाशैली आहे. त्या भाषाशैलीच्या मर्यादेचे उल्लंघन कुठल्याच राजकारण्याने केलं नाही पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे परांजपे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
