Anand Dighe Death Anniversary : आनंद दिघे यांच्यामुळे हे यश मिळालं; स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
Anand Dighe Death Anniversary : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंदाश्रमामध्ये आनंद दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्यामुळेच आपल्याला हे यश मिळाल्याचे म्हटले आहे.
Anand Dighe Death Anniversary : "महाराष्ट्रीतल जनतेच्या शुभेच्छा कामी आल्या आणि आपण ही लढाई जिंकलो. आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आर्शीवादाने हा पल्ला मला गाठता आला याचा मला अभिमान आहे. संपूर्ण जगाने आनंद दिघे हे कोण होते हे पाहिलं आहे. आनंद दिघे यांच्यामुळेच हे यश मिळाले आहे, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी व्यक्त केल्या. शिवसेनेच्या राजकीय कारर्कीदीतील मोठं नावं आनंद दिघे यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंदाश्रमामध्ये आनंद दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्यामुळेच आपल्याला हे यश मिळाल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला.
"आमच्या सरकारने राज्यातील सर्वसामान्यांनासाठी मोठे निर्णय घेतले. कोणलाही अपेक्षित नव्हते तेवढ्या वेगाने युतीच्या सरकारने निर्णय घेतले. हे सरकार सर्व सामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारं सरकार आहे. आम्ही जास्तीत जास्त काम करता येईल तेवढं काम करू. परंतु, अनेकांना आमचं काम घशाखाली उतरत नाही. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आशीर्वाद असल्यामुळे कोणत्याही कामाला अडथळा येणार नाही. आपल्या पोटात एक आणि ओठात एक असं नाही. जे पोटात आहे तेच ओठावर असतं, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
"चांगलं काम करू हीच आनंद दिघे यांना आदरांजली ठरणार आहे. त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून चांगलं काम करेन. त्यामुळे त्यांना समाधन वाटेल, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना आश्वासन दिले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरून देखील आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “वंदनीय गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघेसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन” या कॅप्शनसहीत मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंना श्रद्धांजली अर्पण करणारी पोस्ट शेअर केली आहे.
वंदनीय गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.... pic.twitter.com/S5UoEXUW7Z
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 26, 2022
महत्वाच्या बातम्या