Nagpur News नागपूरमाझं आता राज्यातल्या बहिणीसोबत नणंद भावजयांचं नवीन नातं निर्माण झालंय. हे नवीन नातं मला अतिशय आवडत आहे. या निमित्याने आता आपण एकमेकांचे सुख दुःख वाटून घेऊ, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)  यांनी दिली आहे. भाजपच्या दिव्यांग आघाडीच्या वतीने आज नागपुरात (Nagpur News) दिव्यांग बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यातआला होता. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी अनेक दिव्यांग बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनचा सण साजरा केला. दिव्यांग बांधवांना राखी बांधल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 


देवेंद्रजींना कोट्यवधी बहिणी मिळाल्या अन् मला तेवढ्याच नणंद भावजया - अमृता फडणवीस


राज्यात सध्या सर्वत्र लाडकी बहिण योजनेची (Ladki Bahin Yojana) चर्चा सुरू आहे. राज्यातील बहिणींना या योजनेच्या माध्यमातून मदत होईल असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे, तर आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी फक्त काही महिन्यांसाठी सुरू केलेली योजना आहे, असं म्हणत विरोधकांकडून टीका केली जात आहे. राज्यातील काही महिलांना या योजनेचा पहिला हप्ता नुकताच खात्यात जमा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्यभरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अनेक महिला राखी बांधतान दिसत आहे. यावरून अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत, देवेंद्रजींना कोट्यवधी बहिणीं मिळाल्या, पण मला कोट्यवधी नणंद भावजया मिळाल्या असल्याचे मत व्यक्त केलंय. 


महायुती सरकारने बहिणींच्या रक्षणसाठी योजना आणली


राज्यात महायुती सरकारने बहिणींच्या रक्षणसाठी लाडकी बहीण योजना आणली. त्यात कुठलाही राजकीय दृष्टिकोन नाही. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना कोट्यवधी बहिणीं  लाभल्या आहेत. तर मलाही तेवढ्याच नणंद लाभल्या आहेत. त्यामुळे आमच्यात नवीन नणंद भावजयांचे नातं सुरू झालाय. देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शकपणावर, प्रामाणिकपणावर, त्यांनी याआधी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार सारख्या चांगल्या योजनांवर ही विरोधकांनी टीका केली होती. त्यामुळे ते आताही टीका करत आहेत.


सरकारने चांगल्या हेतूने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ती ते पुढेही सुरू ठेवतील आणि त्यात आवश्यक वाढ करतील, अशी अपेक्षा आहे. मी आधी माझ्या दोनच भावांना राखी बांधायचे, आता दिव्यांग बांधवानाही राखी बांधत आहे. असेही अमृता फडणवीस म्हणाल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या