Washim News वाशिम : आज (19 ऑगस्ट) रक्षाबंधन (Raksha Bandhan) सण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ-बहीण आहेत. हेच भाऊ-बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि आनंदात हा सण साजरा करतात. याच रक्षाबंधनाच्या सणाला आमदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना राखी बांधली.
काही दिसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार भावना गवळी यांना तिकीट न मिळाल्याने त्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार देण्यात आली होती. त्यात त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे दोन दिवसापूर्वी भावना गवळी या दिल्ली येथे असतांना दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आमदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा हा पवित्र सण साजरा केला.
मोदी देशातील कोट्यवधी बहिणींचे भाऊ
बहिण - भावाच्या नात्यातील ऋणानुबंधाचा गोडवा अधिक वृद्धिंगत व्हावा, याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना दरवर्षीप्रमाणे यंदा रक्षाबंधनानिमित्त राखी बांधत मी रक्षाबंधन साजरा केला. मी भाऊ म्हणून मोदी यांना राखी बांधेतच, पण ते देशातील करोडो बहिणींचे देखील भाऊ आहेत. देशातील एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या महिलांबद्दल पहिल्यांदा विचार करणारे व्यक्तिमत्व हे नरेंद्र मोदी यांचे आहे. मोदी या महिलांचे भाऊ आणि पिता देखील आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या जीवनात अनेक बदल झाले असल्याने ते आमचे भाऊ आहेत.
सुप्रिया सुळेंनी भास्कर भगरेंना बांधली राखी
सुप्रिया सुळे काल (18 ऑगस्ट) नाशिक दौऱ्यावर आहेत.रात्री उशिरा त्या नाशिकमध्ये पोहोचल्या. नाशिकमध्य पोहोचताच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदवडमध्ये मेळावा झाला. त्यानंतर खासदार भास्कर भगरे यांचे औक्षण करून सुप्रिया सुळे यांनी त्यांना राखी बांधली.
सुप्रिया सुळे-अजित पवार राजकीय विरोधक
पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती बदलली आहे. अजित पवार यांनी बंड करून भाजपाशी हातमिळवणी केलेली आहे. सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे. तर खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर बसलेला आहे. सुप्रिया सुळे या आपले वडील शरद पवार यांच्या पक्षात आहेत. म्हणजेच सध्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत.
हे ही वाचा