Nitesh Rane रत्नागिरीभाजपचे नेते नितेश राणे(Nitesh Rane) यांनी परत एकदा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर घणाघाती टीका करत गंभीर आरोपही केले आहेत. खासदार संजय राऊत हे काल, रविवारी नागपूर (Nagpur News) जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. या दौर्‍यादरम्यान संजय राऊत यांनी अनिल देशमुखांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. अशातच या भेटीदरम्यान त्यांच्यात काही राजकीय चर्चा देखील झाली. मात्र या भेटीनंतर भाजपचे नेते नितेश राणे यांनी काही फोटो समाजमध्यमांवर प्रसारित करत अनिल देशमुख आणि संजय राऊतांवर परत एकदा प्रहार केलाय.


गुन्हेगारांसोबत रहाल तर जेलमध्ये जावेच लागणार- नितेश राणे 


या पोस्टमध्ये अनिल देशमुख आणि संजय राऊत हे गौतम भटकर नामक एका व्यक्तीसोबतचे फोटो शेअर करत राणेंनी टीका केली आहे. गौतम भटकर हा नागपुरातील कुख्यात गुंड आणि संतोष आंबेकर टोळीचा म्होरक्या असून भटकरवर मोक्कासह खंडणीचे गुन्हे दाखल असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे. अशा गुन्हेगारांसह भोजन केले तर जेलमध्येच जावे लागणार. "जैसी करीन वैसी भरनी" म्हणत नितेश राणेंनी संजय राऊत आणि अनिल देशमुखांना डिवचले आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे आणि यानंतर अनिल देशमुख आणि संजय राऊत नेमकं काय बोलतात, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आले आहे.    


नेमकं काय म्हणाले नितेश राणे?


'गॅंग भोजन!' हे आहेत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्राचा भोंगा संज्या. दोघेही बेलवर बाहेर आहेत. नागपुरात जेवणाचा आनंद घेत आहेत. हरकत नाही. पण बेलवरचे हे दोन्ही आरोपी कुणासोबत जेवतात तेही पहा. गौतम भटकर सोबत आहे. हा भटकर कुख्यात संतोष आंबेकर टोळीचा म्होरक्या. या भटकरवर मोक्का सुद्धा लागला, बलात्कार केला आणि त्याच तरुणीसोबत लग्न करून सुटला. खंडणीचे तर कित्येक गुन्हे त्याच्यावर आहेत.


आता अशा गुन्हेगारांसोबत रहाल तर जेलमध्ये जावेच लागणार. मग भाषणात कशाला सांगता नागपूरच्या माणसामुळे आम्हाला जेलमध्ये जावे लागले! जैसी करनी वैसी भरनी! असे म्हणत भाजपचे नेते नितेश राणे यांनी एक्सवर पोस्ट केली असून या पोस्टच्या माध्यमातून परत एकदा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर घणाघाती टीका करत गंभीर आरोपही केले आहेत. 


हे ही वाचा