एक्स्प्लोर

"ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही", अमृता फडणवीसांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही, अशी टीका अमृता फडणवीसांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 14 डिसेंबरला ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानाचा निषेध केला होता. ते ट्वीट अमृता फडणवीस यांनी आज रिट्वीट केलं आहे.

मुंबई : फक्त 'ठाकरे' आडनाव लावलं म्हणून कुणी 'ठाकरे' यांच्यासारखं होत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 14 डिसेंबरला ट्विटरवरुन राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतच्या वक्तव्याचा निषेध केला होता. देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट अमृता फडणवीस यांनी आज रिट्वीट केलं आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा उल्लेख करताना अमृता फडणवीस यांनी म्हटलं की, एक 'ठाकरे' ज्यांनी कायम सत्य, आपली तत्वे आणि लोकांचा विचार केला. पक्ष, कार्यकर्त्यांचा विचार करताना कुटुंब आणि सत्ता याला दुय्यम स्थान त्यांनी दिलं. तर, सावरकरांच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्ष प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

अमृता फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेनंही तशासतसं चोख उत्तर दिलं आहे. शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी ट्वीट करत म्हटलं की, इतिहासात रघुनाथदादा पेथवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो. ठाकरे ठाकरेच, असं अमेय घोले यांनी म्हटलं. तसेच शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची आज बैठक पार पडली. या बैठकीतही अमृता फडणवीस यांच्या ट्वीटची चर्चा झाली. अमृता फडणवीस यांचं ट्वीट हे बालिशपणाचं लक्षण असल्याचं बैठकीत म्हटलं गेलं.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी देशाचा उल्लेख 'रेप इन इंडिया' केला होता. या वक्तव्यावरून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर काँग्रेसच्या 'भारत बचाओ' रॅलीत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. "मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे", असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. मी मरेन मात्र माफी मागणार नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदींचे असिस्टंट अमित शाह यांनी देशाची माफी मागायला हवी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

राहुल गांधींच्या याच वक्तव्यावरुन भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भाजपने केली होती.

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi Fire  : भिवंडीत गॅस लायटर कंपनीला भीषण आग, संपूर्ण कंपनी जळून खाक
Bhiwandi Fire  : भिवंडीत गॅस लायटर कंपनीला भीषण आग, संपूर्ण कंपनी जळून खाक
Deepak Kesarkar : अशोक खरातच्या कृत्यात सहभागी नाही, कुठल्याही महिलेची ओळख करून दिली नाही; दीपक केसरकरांनी मौन सोडलं
अशोक खरातच्या कृत्यात सहभागी नाही, कुठल्याही महिलेची ओळख करून दिली नाही; दीपक केसरकरांनी मौन सोडलं
शासन मोठ्या निर्णयाच्या तयारीत, LPG ऐवजी PNG पर्याय; पाण्याच्या नळाप्रमाणे गॅसची पाईपलाईन घरोघरी
शासन मोठ्या निर्णयाच्या तयारीत, LPG ऐवजी PNG पर्याय; पाण्याच्या नळाप्रमाणे गॅसची पाईपलाईन घरोघरी
रेग्यूलर कर्ज भरणाऱ्याला 50 हजार देऊन चालणार नाही, त्यांना दीड लाख रुपये द्या, बच्चू कडूंची सरकारकडे मागणी
रेग्यूलर कर्ज भरणाऱ्याला 50 हजार देऊन चालणार नाही, त्यांना दीड लाख रुपये द्या, बच्चू कडूंची सरकारकडे मागणी

व्हिडीओ

Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार
Chandrashekhar Bawankule | राज्यात भोंदूबाबा तयार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
Kolhapur News: कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
Embed widget