एक्स्प्लोर

अमरावतीत विनाकरण फिरणाऱ्या नागरिकांच्या भरचौकात चाचण्या

कोरोनाचा संसर्ग थांबविण्‍यासाठी आणि एखाद्या बाधिताकडून इतर कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच रॅपिड अँन्‍टीजन चाचणी करण्‍याचा उपक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे.

अमरावती : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या बेजबाबदार कोविडप्रसारकांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची धडक मोहिमच अमरावती जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यात राबवली. अमरावती शहरातील राजकमल चौकात या धडक मोहिमेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सहभागी होत कारवाईला चालना दिली.महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह विविध अधिकारी मोहिमेत सहभागी होते. शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चक्क रस्त्यावरच चाचणी करण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नाही. हा संसर्ग थांबविण्‍यासाठी आणि एखाद्या बाधिताकडून इतर कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच रॅपिड अँन्‍टीजन चाचणी करण्‍याचा उपक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे. अमरावती शहरात उपक्रमाची गुरुवारपासून अंमलबजावणी करण्‍यात आली. उपायुक्‍त रवि पवार यांनी रस्त्यावर उतरून पोलीस निरीक्षक यांच्‍या मदतीने विनाकारण फिरणा-यांची अँन्टीजन चाचणी केली.

राजकमल चौक आणि राजापेठ चौकात विनाकारण फिरणाऱ्यांची  अँन्‍टीजन चाचणी करण्‍यात आली. 208 नागरिकांची अँन्‍टीजन चाचणी करण्‍यात आली. इतवारा बाजार येथे रॅपिड अँन्‍टीजन टेस्‍ट शिबिर घेण्‍यात आले होते. त्याठिकाणी 1 व्‍यक्‍ती पॉझिटिव्‍ह आढळली.

जिल्ह्यात ठिकठिकाणी ही मोहिम  राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. चांदुर रेल्वेच्या जुन्या एस.टी. स्थानकावरही 40 जणांना तपासण्यात आले. 

पॉझिटिव्ह आढळल्यास भरती

निष्कारण फिरणाऱ्यावर कारवाई करतानाच पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या व्यक्तींना तत्काळ कोविड केअर केंद्रात उपचारार्थ दाखल केले जाणार आहे. 

राजकमल चौकातील तीन दुकाने सील

लॉकडाऊनमध्‍ये जीवनावश्‍यक वस्‍तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्‍याचे निर्देश असतांना राजकमल चौक येथे खुले असलेल्या दुग्‍धपुर्णा शितालय दुकान, विमल डिजिटल लॅब, श्री बालाजी दुकानावर मनपाच्‍या पथकाने कारवाई करुन दंड ठोठावला. संचारबंदी काळात अत्‍यावश्‍यक वस्‍तू न पुरविणारे दुकाने सुरु असतांना आढळली म्‍हणून दुग्‍धपुर्णा शितालय दुकान, विमल डिजिटल लॅब, श्री बालाजी दुकानाला यावेळी सील करण्‍यात आले.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Paithan Crime : विकृतीचा कळस! मदतीचे नाटक करत घरात नेले, 80 वर्षीय वयोवृद्ध आजीसोबत नको नको ते केलं; आरडाओरड होताच माणूसकीला काळिमा फासणारं सत्य समोर आलं, पैठण हादरलं
विकृतीचा कळस! मदतीचे नाटक करत घरात नेले, 80 वर्षीय वयोवृद्ध आजीसोबत नको नको ते केलं; आरडाओरड होताच माणूसकीला काळिमा फासणारं सत्य समोर आलं, पैठण हादरलं
Tukaram Mundhe News: 21 वर्षांत 25 वी बदली, तुकाराम मुंढेंच्या 4 शब्दांनी धाबे दणाणले, राज्यभर FDA ची 40 ठिकाणी छापेमारी
21 वर्षांत 25 वी बदली, तुकाराम मुंढेंच्या 4 शब्दांनी धाबे दणाणले, राज्यभर FDA ची 40 ठिकाणी छापेमारी
Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
Ramdas Athawale: आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Embed widget