Amravati Crime : तो माझा आहे, तुझ्यामुळेच दुरावा आला! तरुणीकडून मैत्रिणीची सुपर एक्स्प्रेस हायवेवर चाकूने भोसकून हत्या
गेल्या 48 तासात अमरावतीमध्ये तीन तरुणांचा निर्घृण खुनांची मालिकाच झाली असतानाच आता बाॅयफ्रेंडच्या वादातून एका तरुणीने मैत्रिणीला चाकून भोसकून खून केल्याची घटना घडली.
Amravati Crime : महाराष्ट्रात चिमुरडीपासून वृद्ध महिलांपर्यंत अत्याचाराची मालिका सुरुच असताना विदर्भातून एक भयंकर घटना समोर आली आहे. गेल्या 48 तासात अमरावतीमध्ये तीन तरुणांचा निर्घृण खुनांची मालिकाच झाली असतानाच आता बाॅयफ्रेंडच्या वादातून एका तरुणीने मैत्रिणीला चाकून भोसकून खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे.
तो माझाच आहे, तुझ्यामुळे दुरावा निर्माण झाला!
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार तो माझाच आहे तुझ्यामुळे दुरावा निर्माण झाला असा समज करून घेत अमरावती शहरातील एका तरुणीने आर्वीमधील युवतीला चाकूने भोसकले. ही भयंकर घटना मंगळवार रात्री साडेआठच्या सुमारास दस्तूरनगर सुपर एक्सप्रेस हायवेवर घडली. मैत्रीण रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंत तरुण आणि तिचा मित्र फरार झाले आहेत. पोलिलांनी दिलेल्या माहितीनुसार शुभांगी (वय 26 रा. आर्वी जि. वर्धा) असे मृत तरुणीचे नाव आहे.
नेमका प्रकार काय घडला?
शुभांगी मित्रासह दोन दिवसांपूर्वी अमरावतीमधील यशोदानगरमध्ये वाढदिवसानिमित्त आली होती. यानंतर हे तिघे फिरण्यासाठी सुपर एक्स्प्रेस हायवेवर फिरण्यासाठी गेले होते. मंगळवार रात्री हे तिघे फिरण्यासाठी गेल्यानंतर सुरज देशमुख हा देखील तेथे आला होता. त्याच्याशी शुभांगीची ओळख होती. त्यामुळे शुभांगीच्या उपस्थितीत सुरज व त्याच्या मैत्रिणीमध्ये असलेला तणाव दूर करायचा होता. त्यांच्या काही काळ चर्चा झाली. त्यावेळी सूरजची मैत्रीण तिथे पोहोचली. त्यामुळे संशयाने पछाडलेल्या युवतीने शुभांगी त्याच्याशी बोलत असल्याचे पाहताच दोघींमध्ये वाट सुरू झाला.
हा वाद इतका टोकाला गेला की त्या तरुणीने चाकूने शुभांगीच्या गळ्यावर वार केले. गळ्यावरच वार झाल्याने शुभांगी रक्ताच्या थारोळ्यात पडली. शुभांगीसोबत आलेल्या अन्य दोघांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या