एक्स्प्लोर
Advertisement
अमरावतीत 'देऊळ', युवकाला स्वप्नात दृष्टांत दिला अन् वृक्षरुपी देवाला पुजायला भरली जत्रा
गावातील मोहाच्या झाडाखाली भगवान शंकर आणि माता पार्वतीचे वास्तव्य असल्याचा दृष्टांत त्याला स्वप्नातून झाला. मग काय गावकऱ्यांनी सुरू केली त्या झाडाची पूजा. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि आता हळूहळू गावाच्या आजूबाजूचे लोकं तिथे येऊन पूजा करायला लागले.
अमरावती : तुम्ही देऊळ चित्रपट नक्की बघितला असेल. या चित्रपटातल्या केशव नावाच्या व्यक्तीला एक स्वप्न पडतं आणि स्वप्नात त्याला गावातल्या एका झाडाखाली दत्त प्रकट झालेले दिसतात. पाहता पाहता ही वार्ता अख्ख्या गावात पसरते आणि काही दिवसांनी तिथं देवस्थान उभं राहतं. अमरावती जिल्ह्यातल्या एका गावात असाच प्रकार घडला आहे.
मोहाच्या झाडाखाली देव असल्याच्या भावनेतून अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील भेमडी गावात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. या गावातील एका 25 वर्षीय युवकाला काही दिवसांपूर्वी एक स्वप्न पडले की गावातील मोहाच्या झाडाखाली भगवान शंकर आणि माता पार्वतीचे वास्तव्य असल्याचा दृष्टांत त्याला स्वप्नातून झाला. मग काय गावकऱ्यांनी सुरू केली त्या झाडाची पूजा. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि आता हळूहळू गावाच्या आजूबाजूचे लोकं तिथे येऊन पूजा करायला लागले आणि आता भेमडी गावातील त्या झाडाच्या परिसराला शिवरात्रीला जत्रेचे स्वरूप आले होते.
3 फेब्रुवारीपासून अमरावती जिल्ह्यातील भेमडी गावातील मोहाच्या झाडाच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आले आहे. वरुड तालुक्याच्या भेंमडी या आदिवासीबहुल गावात एका 30 वर्षीय युवकाला 2 फेब्रुवारी रोजी रात्री स्वप्न पडले. गावातील मोहाच्या झाडाखाली भगवान शंकर आणि माता पार्वतीचे वास्तव्य असल्याचा दृष्टांत त्याला स्वप्नातून झाला. तरुणाने ग्रामस्थांना तो सांगितला. तो युवक 3 फेब्रुवारीला गावातील त्या मोहाच्या झाडाजवळ गेला. त्यावेळी ते झाड जमिनीकडे झुकल्याचा भास त्याला झाला. पाहता-पाहता ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी भेमडी गाव गाठले. पूजा-अर्चा सुरु झाली.
विशेष म्हणजे या झाडाला कवटाळले असता, आजार बरे होतात, अशी अंधश्रद्धा पसरली आहे. यामुळे आता इथं मध्य प्रदेशातूनही आता लोक येताहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी संधीचा लाभ घेत काहींनी तेथे पूजा साहित्य, चहा, नाष्ट्याची दुकाने थाटली आहेत. 25 दिवसांत देव उभा झाला असून प्रसिद्धीसही आला आहे.
आदिवासी समाजात कोणत्याही शुभ कार्यात मोहा आणि साल या झाडाची जन्मापासून ते मृत्यूपर्यंत पूजा केली जाते. त्यामुळे या युवकाला मोहाच्या झाडाखाली देव असल्याचं स्वप्न पडलं आणि याठिकाणी आता दररोज अनेक भाविक येत असून अनेकांचे आजारही बरं होत असल्याची भावना गावकऱ्यांनी बोलून दाखवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement