Ramdas Kadam : जे सख्ख्या भावाचे झाले नाहीत, ते जनतेचे काय होणार? रामदास कदमांच्या भाऊबंदकीच्या वादात शिवसेना ठाकरे गटाची उडी!
आमदार योगेश कदम आणि त्यांचे वडील रामदास कदम कधीच कोणाचे होऊ शकत नाहीत. जे सख्ख्या भावाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार? असा हल्लाबोल संजय कदम यांनी केला.
Ramdas Kadam : कोकणात एकबाजूला गणेशोत्सवाची धूम सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला राजकीय धूम देखील सुरू आहे. माजी मंत्री शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी आमदार योगेश कदम यांच्या विरोधात दापोली विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काम करून त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केलं आहे. आमदार योगेश कदम यांना त्यांच्या मतदारसंघात सख्ख्या चुलत भावाचे आव्हान उभे राहिलं आहे. याविषयी प्रतिक्रिया देत असताना आमदार योगेश कदम यांनी माजी आमदार संजय कदम यांच्यावर घडफोडीचे आरोप केले. याबाबत माजी आमदार आणि उबाठाचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी देखील प्रतिक्रिया दिली.
जे सख्ख्या भावाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार?
आमदार योगेश कदम आणि त्यांचे वडील रामदास कदम कधीच कोणाचे होऊ शकत नाहीत. जे सख्ख्या भावाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार? असा हल्लाबोल संजय कदम यांनी केला. रामदास कदम यांनी व्यवसायात अग्रगण्य असलेल्या आपल्याच भावाच्या पाठीशी ईडी लावून त्यांना अकरा महिने जेलमध्ये ठेवले. त्यांच्या सर्व व्यवसायांची चौकशी लावून नाहक त्रास देण्याचे काम केले. सख्खा पुतण्या अनिकेत कदम यांनी राजकारणात पदार्पण केल्यामुळे त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. योगेश कदम यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघातून 25 हजार मताधिक्य देईन त्यापेक्षा एक मत जरी कमी असेल तर मी निवडणूक लढणार नाही, असा वादा या दादांनी केला होता. तो आता पाळणार का? असा प्रश्न जनता विचारत आहे. जो बोलतो ते करतो असे बॅनर लावण्याआधी हा देखील बॅनर लावा असा खोचक टोला देखील माजी आमदार संजय कदम यांनी लगावला.
दापोलीत भाऊबंदकी जोरात
दरम्यान, दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदम यांच्यासमोर नवे आव्हान उभं राहिलं आहे. विधानसभा निवडणुकीत सख्खा चुलत भाऊ योगेश कदम यांच्या विरोधात काम करणार आहे. उद्योजक सदानंद कदम यांचा मुलगा अनिकेत कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात करणार उबाठा गटाचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रामदास कदम आणि योगेश कदम या बाप लेकांमसोर भाऊबंदकीचे आव्हान आहे. काही दिवसांपूर्वीच अनिकेत कदम यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संजय कदम यांना निवडून आणण्यासाठी काम करण्याचा अनिकेत कदम यांनी निर्धार केला आहे. त्यामुळे रामदास आणि सदानंद कदम यांच्यातील वाद आता राजकीय मैदानात पोहोचला आहे. दापोलीतून संजय कदम हे ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या