एक्स्प्लोर

जब तक जियेंगे तब तक लढेंगे; ममता बॅनर्जींचा मुंबईत हल्लाबोल

West Bengal CM Mamata Banerjee Mumbai Visit : दीदींनी मनं जिंकली. वाय. बी. सेंटरमधील संवादाची सुरुवात मराठीतून केली.

West Bengal CM Mamata Banerjee Mumbai Visit : पश्चिम बंगलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी त्या शरद पवारांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी त्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाल्या होत्या. तिथे ममता बॅनर्जींनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील जनतेची मनं जिंकली. ममता बॅनर्जींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "महाराष्ट्रातील सर्व प्रबुद्ध जनतेला माझे अभिवादन आणि हार्दिक शुभेच्छा!" त्यावेळी सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडात केला. 

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishekh Banerjee) देखील त्यांच्यासोबत आहेत. आज 1 डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी दुपारी 3 वाजता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी 'सिल्व्हर ओक'वर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल (मंगळवारी) ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली होती. 

ममता बनर्जी टीएमसीचा (Trinamool Congress) राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. ज्यामुळे त्या काही दिवसांपासून त्या देशभरातील राज्यांचा दौरा करत आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना काल (मंगळवारी) ममता बॅनर्जी यांनी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर आज ममता बॅनर्जी या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. तर आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.  

2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मोट बांधण्याच्या दृष्टीने या भेटीचं मोठं महत्व असल्याचं बोललं जात आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत अधिकृत माहिती दिली होती. ममता बॅनर्जी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सांगितलं होतं. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस भाजपविरोधातील मोठा पक्ष असेल, असंही घोष यांनी सांगितलं होतं. मुंबई भेटीत ममता बॅनर्जी काही उद्योगपतींचीही भेट घेणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये व्यावसाय वाढीसाठी ही भेट असल्याचं बोललं जात आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान दौऱ्यावरही जाणार आहेत. या दौऱ्यात राजस्थानमधील पक्षाची ताकद वाढवण्यावर भर  देण्यात येणार आहे. गोवा,  मेघालय, त्रिपुरा आणि आसाममध्येही निवडणुकीत लढण्याचा निर्णय ममता बॅनर्जींनी घेतला आहे.  दरम्यान, सोमवारी कोलकातामध्ये झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या वर्किंग कमेटीच्या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय विस्ताराच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. बैठकीत हे ठरलं की, पक्ष घटनेत बदल करण्यापासून ते राष्ट्रीय स्तरावर भाजपला घेरण्यापर्यंत सर्व प्रकारची पावले उचलली जातील. वर्किंग कमिटीच्या सदस्यांची सध्याची संख्या 21 असून ती वाढवण्यात येण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. 

भाजप विरोधात तिसरी आघाडी होणार?

ऑगस्ट महिन्यात ममतांनी पहिला मोठा दिल्ली दौरा आखला. त्यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट टाळली होती. विशेष म्हणजे, संसद अधिवेशनाच्या निमित्तानं त्यावेळी शरद पवार दिल्लीत होते. पण त्यावेळी अरविंद केजरीवाल, कनिमोळी यांची भेट घेणाऱ्या ममतांनी पवारांची मात्र भेट घेतली नव्हती. त्यावेळी ममता बॅनर्जींनी जाणूनबुजून शरद पवारांची भेट टाळल्याचं बोलंलं जात होतं. राजकीय चर्चांमध्ये तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वासाठी पवारांचं नाव नेहमीच चर्चेत असतं. या पार्श्वभूमीवर या दोघांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे. ममता मुंबईसोबतच मोदींच्या वाराणसीवरही लक्ष ठेवून आहेत. लवकरच आपण वाराणसीत जाणार असल्याचं ममतांनी घोषित केलं आहे. मोदींचं वाराणसीत आपला जम बसवण्याच्या प्रयत्न ममता यांचा असणार आहे. 

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला मदत करायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ममतांप्रमाणेच केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही विस्ताराची मोठी योजना आखतोय. केजरीवाल गोवा, पंजाब, उत्तराखंड, गुजरात या राज्यांमध्ये विस्ताराची मोठी योजना आखत आहेत. त्यामुळे आता 2024 च्या या शर्यतीत नेमकं कोण पुढे येणार आणि कोण भाजपला टक्कर देऊ शकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Babn Gite: लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Ports Water Level : कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावरुन धोकादायक पद्धतीने वाहतूकVidhansabha Diary : आतापर्यंतच्या विधानसभा अधिवेशनातील घडामोडी : 1 जुलै 2024 :  ABP MajhaDeekshabhoomi Nagpur :  नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात आंदोलन : ABP MajhaBhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर  'माझा'वर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Babn Gite: लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
Embed widget