एक्स्प्लोर

50 फुट खोल विहिरीत पडलेल्या साळींदरला वाचवण्याचा थरार; प्राणीमित्रांनी रॅपलिंग करून दिले जीवदान

पाण्यात उतरून सुद्धा साळिंदर पिंजऱ्यात यायला तयार नव्हते. शेवटी त्याला एक कोपऱ्यात व्यवस्थित ट्रॅप करून पिंजऱ्यात घालण्यात सुरेश यांना यश आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सोलापूर :  उत्तर सोलापुरातील रानमसले येथील शेतकरी प्रकाश दिवटे यांच्या शेतातील विहिरीत दोन दिवसांपूर्वी एक साळिंदर पडल्याची अशी माहिती वाईल्डलाइफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूरच्या सदस्यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच WCAS ची टीम रानमसलेच्या दिशेने रवाना झाली. रानमसले जाऊन पाहणी केली असता एका 50 फूट खोल पायऱ्या नसलेल्या विहिरीत साळिंदर पडले असल्याचे दिसून आले. सुरुवातीला लहान पिंजरा विहिरीमध्ये सोडून त्याला काठावरूनच पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो अयशस्वी ठरला.

 शेवटी प्रसंगवधान राखून WCAS चे सदस्य सुरेश क्षीरसागर यांना हारनेसच्या सहाय्याने रॅपलिंग करून खाली विहिरीत उतरावे लागले. परंतु खाली उतरून सुद्धा साळिंदर पूर्ण विहिरीत कधी पाण्यात तर कधी पाण्याबाहेर असा लपंडाव खेळत असल्यामुळे आमची दमछाक झाली होती. त्यामुळे त्याला पकडणे फार अवघड जात होते. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला की, आपल्या शेपटीकडील काट्यांची ढाल सामोरे करून तो संरक्षक पवित्रा घेत होता. शेवटचा प्रयत्न व मास्टरस्ट्रोक म्हणून सुरेश यांना पाण्यात उतरायला सांगण्यात आले.  

सुरेश यांनी पाण्यात उतरून सुद्धा साळिंदर पिंजऱ्यात यायला तयार नव्हते. शेवटी त्याला एक कोपऱ्यात व्यवस्थित ट्रॅप करून पिंजऱ्यात घालण्यात सुरेश यांना यश आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्याला सुरक्षितरीत्या पकडल्यानंतर सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात सुरेश यांचे आभार मानले. या घटनेबाबत आधीच माळढोक पक्षी अभयारण्य, नान्नज विभागाला कळविण्यात आले होते. त्यांच्या नोंदीनंतर त्या साळिंदरला लगेच जवळच त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडून देण्यात आले. 

या बचावकार्यात WCAS चे अजित चौहान, सुरेश क्षीरसागर, काशिनाथ धनशेट्टी आणि रत्नाकर हिरेमठ यांनी सहभाग घेतला. तर माळढोक पक्षी अभयारण्य नान्नजकडून  वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी जावळे, ललिता बडे,अशोक फडतरे आणि वनमजुर सुधीर गवळी यांनी सहकार्य केले. 

साळींदर हा निशाचर प्राणी असून, ऊस शेतीच्या ठिकाणी त्याचा मोठ्या प्रमाणात रहिवास असतो. साळींदर हा काटे अंगावर फेकतो, अशा अनेक प्रकारच्या गैरसमजुती असल्यामुळे याच्या शिकारीच्या घटना सर्रास घडतात. हा प्राणी वनखात्याचा सूची चारमध्ये येत असून साळींदर मारण्यास अथवा मृत प्राण्याचे मांस बाळगणे, विक्री करणे हा गुन्हा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Embed widget