News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

पाकिस्तानी लोकांना 'पद्मश्री', मात्र देशाला पहिलं पदक मिळवून देणारा उपेक्षित : रणजित जाधव

गायक अदनान सामी याला दिलेल्या पद्मश्री पुरस्कारावरुन वाद सुरू आहे. अशातच देशाला ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक मिळवून देणाऱ्या पैलवान मात्र उपेक्षित असल्याची टीका खाशाबा जाधव यांचा मुलगा रणजित जाधव यांनी केली आहे. या प्रकरणी रणजीत आता न्यायालयात जाणार आहे.

FOLLOW US: 
Share:
कोल्हापूर : जे भारतीय नाहीत अशा पाकिस्तानी लोकांना पद्मश्री पुरस्कार दिला जातो. मात्र, ऑलिम्पिकच्या दुनियेत ज्यांनी देशाला पहिलं पदक मिळवून दिलं, त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळत नाही. आता पुरस्कारासाठी भिक मागावी का? असा सवाल खाशाबा जाधव यांचा मुलगा रणजित जाधव यांनी केलाय. खाशाबा जाधव यांनी 1952 साली भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवून दिलं होतं. ते हयात असताना त्यांनी पद्मश्री पुरस्कारासाठी अनेकवेळा हेलपाटे घातले. मात्र, त्यांना उपेक्षित ठेवले. त्यांच्या मृत्यूनतंरही गेल्या 19 वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या त्यांच्या मुलालाही आता त्यांचे नातेवाईक हिनवू लागलेत. त्यामुळे आता रणजित जाधव यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मूळचा पाकिस्तानी गायक अदनान सामीला जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराला मनसेने विरोध केला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करुन अदनानला जाहीर झालेल्या पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध केला आहे. याचाच दाखला देत पैलवान खाशाबा जाधव यांच्या मुलाने केंद्र सरकारला सवाल केला आहे. पाकिस्तानी लोकांना पद्मश्री पुरस्कार दिला जातो. मात्र, ऑलिम्पिकच्या दुनियेत ज्यांनी देशाला पहिलं पदक मिळवून दिलं, त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळत नसल्याची खंत रणजित जाधव यांनी व्यक्त केली आहे. 19 वर्षांपासून संघर्ष करुनही सरकारने दखल न घेतल्याने रणजित जाधव यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. खाशाबा जाधवांच्या 'पद्मविभूषण' शिफारशीची फाईल गहाळ - कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 'पद्मविभूषण'ने सन्मान व्हावा, म्हणून सरकार दरबारी दिलेली फाईल फडणवीस सरकारच्या काळात गहाळ झाली होती. खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत आपली व्यथा मांडली. खाशाबा जाधव यांना पद्मविभूषण मिळावं, म्हणून पावसाळी अधिवेशनात त्यांच्या कुटुंबीयांनी क्रीडा मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी तावडेंनी आश्वासन दिल्याचं रणजीत जाधवांनी सांगितलं. पुरस्कार मिळण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं, पण ती प्रक्रिया करण्यात आली नाही. जाधव कुटुंबीयांनी याबाबत क्रीडा विभागाला विचारणा केली असता, ती फाईल गहाळ झाल्याची माहिती मिळाली. कोण आहेत खाशाबा जाधव? खाशाबा जाधव हे कुस्तीगीर होते. 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकलेलं कांस्यपदक हे भारताला स्वातंत्र्योत्तर काळात मिळालेलं पहिलं वैयक्तिक पदक होतं. 1948 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता. भारत सरकारने पद्म पुरस्काराने सन्मानित न केलेले ते एकमेव ऑलिम्पिक पदक विजेते असल्याची माहिती आहे. खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातल्या गोळेश्वर गावात एका मराठमोळ्या कुटुंबात झाला. 2001 मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. Special Report | देशाच्या पहिल्या ऑलिम्पिक पदकविजेते खाशाबा जाधवांना अजूनही 'पद्म' पुरस्कार का नाही? | ABP Majha
Published at : 28 Jan 2020 01:48 PM (IST) Tags: india first olympic medallist Padma shri nomination singer Adnan Sami first olympic medallist Khashaba jadhav padma shri kolhapur

आणखी महत्वाच्या बातम्या

उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण! मुंबई हायकोर्टानं आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण! मुंबई हायकोर्टानं आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

उदय सामंतांचं फरफेक्ट नियोजन! राज्यात शिंदेंच्या शिवसेनेनं खातं खोललं, रत्नागिरी जिल्ह्यात पहिला उमेदवार बिनविरोध

उदय सामंतांचं फरफेक्ट नियोजन! राज्यात शिंदेंच्या शिवसेनेनं खातं खोललं, रत्नागिरी जिल्ह्यात पहिला उमेदवार बिनविरोध

ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU

ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU

गळ्यात कांद्याच्या माळा, डोळ्यात पाणी, माढ्यात अनोख्या पद्धतीनं शेतकऱ्याचा उमेदवारी अर्ज दाखल

गळ्यात कांद्याच्या माळा, डोळ्यात पाणी, माढ्यात अनोख्या पद्धतीनं शेतकऱ्याचा उमेदवारी अर्ज दाखल

नागपूरमध्ये भरदिवसा 23 तरुणीची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती

नागपूरमध्ये भरदिवसा 23 तरुणीची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती

टॉप न्यूज़

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली

भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के

भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के

Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?

Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?

मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला

मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला