News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

विधानसभेसाठी युती राहणार, पण मुख्यमंत्री भाजपचाच, अमित शाहांच्या भूमिकेवरुन शिवसेनेत अस्वस्थता

अमित शाहांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शिवसेनेत अस्वस्थता असल्याचं चित्र आहे. अमित शाहांच्या बैठकीतील मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यावरुन शिवसेनेत नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी चंद्रकांत पाटलांनी युतीच्या फॉर्म्युल्यावर  केलेल्या वक्तव्यानेही शिवसेनेत नाराजी होती. भाजपच्या कोअर कमिटीची काल रविवारी दिल्लीत बैठक झाली. राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवर यावेळी मंथन करण्यात आलं. विधानसभेसाठी शिवसेनेसोबत युती राहणार आहे, मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचाच हवा असं वक्तव्य अमित शाहांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत विधानसभेला युती ही होणारच आहे. लोकसभेला मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी काम केलं. तसंच विधानसभेला भाजपचा मुख्यमंत्री बनण्यासाठी करायचं आहे. केवळ आपल्याच जागांवर नव्हे तर मित्रपक्षाच्या ही जागा निवडून आणण्यासाठी तितकीच मेहनत करा, अशा सूचना अमित शाहांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला दिलेल्या 'अवजड' मंत्रिपदावरुनही शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी याचं खंडन केलं. सोबतच शिवसेनेने लोकसभा उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्याची मागणीही केली होती. चंद्रकांत पाटलांनी युतीच्या फॉर्मुल्यावर केलेल्या वक्तव्यावरुनही शिवसेना नाराज होती. आता अमित शाहांच्या कोअर कमिटीतील कानमंत्रामुळे त्यात भरच पडली आहे. दरम्यान कोल्हापुरात उद्धव ठाकरे म्हणाले होते की आमचं ठरलं आहे. त्यामुळे शिवसेनेचं नेमकं काय ठरलयं? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Published at : 10 Jun 2019 09:02 AM (IST) Tags: uddhav thackerey alliance vidhansabha election matoshree Maharashtra Politics BJP Shivsena amit shah

आणखी महत्वाच्या बातम्या

Maharashtra LIVE: महाराष्ट्र काँग्रेसला मिळाला नवा प्रदेशाध्यक्ष, ऑपरेशन टायगर जोरात, राज्यात नेमकं काय चाललंय?

Maharashtra LIVE: महाराष्ट्र काँग्रेसला मिळाला नवा प्रदेशाध्यक्ष, ऑपरेशन टायगर जोरात, राज्यात नेमकं काय चाललंय?

Maharashtra Weather Update: सोलापूर, लोणावण्यात 38 अंशांची नोंद, राज्यात उकाड्याने लाही लाही, कुठे कसे राहणार तापमान? वाचा IMD रिपोर्ट

Maharashtra Weather Update: सोलापूर, लोणावण्यात 38 अंशांची नोंद, राज्यात उकाड्याने लाही लाही, कुठे कसे राहणार तापमान? वाचा IMD रिपोर्ट

अंगणवाडी सेविका भरतीसाठी शिक्षण किती असावे? वयाची मर्यादा काय? महत्त्वाच्या 15 अटी वाचा एका क्लिकवर!

अंगणवाडी सेविका भरतीसाठी शिक्षण किती असावे? वयाची मर्यादा काय? महत्त्वाच्या 15 अटी वाचा एका क्लिकवर!

साखर संघासह कारखानदारांचे शेतकऱ्यांच्या विरोधात कारस्थान, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले निकाल शेतकऱ्यांच्या बाजूनेच लागणार

साखर संघासह कारखानदारांचे शेतकऱ्यांच्या विरोधात कारस्थान, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले निकाल शेतकऱ्यांच्या बाजूनेच लागणार

अंगणवाडी सेविका भरतीसाठी कोणकोणती कागदपत्रं लागणार? सगळी यादी एका क्लिकवर; 7 व्या क्रमांकाचे कागदपत्र फार महत्त्वाचे!

अंगणवाडी सेविका भरतीसाठी कोणकोणती कागदपत्रं लागणार? सगळी यादी एका क्लिकवर; 7 व्या क्रमांकाचे कागदपत्र फार महत्त्वाचे!

टॉप न्यूज़

जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

  ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला

   ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला

Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश

Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश

New Income Tax Bill 2025 : बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?

New Income Tax Bill 2025 : बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?