एक्स्प्लोर

Sanjay Raut Reaction on ED Summons : 'या मला अटक करा'; ईडीच्या समन्सनंतर संजय राऊतांचं खुलं आव्हान

Sanjay Raut Reaction on ED Summons : ईडीकडून समन्स बजावल्यानंतर संजय राऊतांचं ट्वीट; म्हणतात, 'या मला अटक करा'

Sanjay Raut Reaction on ED Summons : राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आलं आहे. तसेच, उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश त्यांना या समन्समधून देण्यात आले आहेत. पत्राचाळ कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी आणि पर्ल ग्रुप प्रकरणात संजय राऊतांना समन्स बजावण्यात आलं आहे. ईडी समन्सची माहिती मिळताच संजय राऊतांनी एक ट्वीट केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या ट्वीटमधून त्यांनी 'या मला अटक करा' असं खुलं आव्हान दिलं आहे. तसेच, संजय राऊतांनी हे ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे. संजय राऊतांच्या या ट्वीटमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

'या मला अटक करा' : संजय राऊत 

ईडी समन्सनंतर संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत म्हटलंय की, "मला आताचा समजलं ED नं मला समन्स पाठवलं आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी... हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या... मला अटक करा! जय महाराष्ट्र!" धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी हे ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांना टॅग केलं आहे. 

संजय राऊतांना ईडी समन्स 

राज्यातील राजकीय पेच सुटण्याची काही चिन्हं दिसेनात. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांच्या गटासह केलेल्या बंडामुळं शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आणि राज्यात सत्तासंघर्षाची ठिणगी पेटली. राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच आता राज्यात खळबळ माजवणारी बातमी हाती आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीनं (ED) समन्स बजावलं आहे. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. उद्या ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याचे संजय राऊतांना आदेश दिले आहेत. दरम्यान, यासंदर्भातील कोणतीही नोटीस ईडीकडून अद्याप मिळालेली नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

राऊतांना समन्स बजावण्यात आलेला कथित पत्राचाळ घोटाळा काय? 

पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. नेमका काय आहे हा घोटाळा, हे जाणून घेऊया. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sanjay Raut ED : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीचं समन्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh Akola On Supriya Sule : बारामतीच्या ताईंनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन नाही केलं पाहिजेDeepak Nikalje : छोटा राजनचे बंधू विधानसभेच्या मैदानात भिडणार शिंदे-ठाकरेंच्या उमेदवाराला !Raj Thackeray Bag Check : सोलापूर दौऱ्यावर राज ठाकरेंच्या बॅगची तपासणी,व्हिडीओ समोरBullet Patil Exclusive | 26 वर्ष पोलीस आता राजकारणात एन्ट्री; बुलेट पाटलांची बुलेटवर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Embed widget