एक्स्प्लोर

Rahul Gandhi on Maratha Reservation : राहुल गांधी मराठा आरक्षणावर बोलले! विनोद पाटलांकडून भूमिकेचं स्वागत; नेमकं काय म्हणाले?

पुण्यातील काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राहुल गांधी यांनी राज्यात अत्यंत संवेदनशील झालेल्या मराठा आरक्षणाला हात घातला. 

Rahul Gandhi on Maratha Reservation : इंडिया आघाडी सत्तेत आल्यास देशातील आरक्षणाची मर्यादा 50 टक्के काढून टाकू, अशी महत्त्वपूर्ण घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi on Maratha Reservation) यांनी पुण्यातील जाहीर सभेत केली. दलित 15 टक्के, अदिवासी 8 टक्के आणि मराठा, धनगरांसह मागास वर्गास 50 टक्के, असे 73 टक्के आरक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली. पुण्यातील काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राहुल गांधी यांनी राज्यात अत्यंत संवेदनशील झालेल्या मराठा आरक्षणाला हात घातला. 

विनोद पाटलांकडून भूमिकेचं स्वागत

दरम्यान, राहुल गांधी मराठा आरक्षणावर बोलल्यानंतर मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा दिलेल्या विनोद पाटील यांनी स्वागत केलं आहे. त्यांनी राहुल गांधी यांचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राहुल गांधी मराठा आरक्षणावर बोलले! त्यांनी सांगितलं की, आमचं सरकार देशात आल्यास जातीय जनगणना करू व 50% आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा कायदा संसदेत करू. राहुलजी गांधी यांच्या भूमिकेचं स्वागत करतो.

जातीवर आधारित जनगणना करणार 

राहुल गांधी यांनी सभेतून सांगितले की, आमचं सरकार आल्यानंतर जातीवर आधारित जनगणना केली जाईल. जातीच्या संख्येनुसार सर्वांना संधी दिली जाईल. देशातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली जाईल. अग्निवीर योजनेसह जीएसटी बंद केला जाईल. सध्या पेपरफुटीचे प्रमाण वाढले आहे. पेपर लीक करणाऱ्यांनाही कडक शिक्षा दिली जाईल. सर्व पेपर सरकारी आयोगामार्फत घेतले जातील, अशी ग्वाही त्यांनी आपल्या भाषणातून दिली. 

पीएम मोदी आणि भाजपला संविधान संपवायचं असल्याचा आरोपही गांधी यांनी केला. आमची लढाई संविधान वाचविण्याची आहे. संविधान संपविले जाईल, त्यादिवशी तुम्ही भारत देशाला ओळखू शकणार नाही. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आम्ही कधी संपवू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad : त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
Bacchu Kadu: ...तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
....तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
Nashik Crime : सोनाराच्या दुकानात तिघांकडून दिवसाढवळ्या दरोडा, टोळीचा म्होरक्या हरियाणात लपल्याची टीप, नाशिक पोलिसांचे पथक पोहोचले अन्...
सोनाराच्या दुकानात तिघांकडून दिवसाढवळ्या दरोडा, टोळीचा म्होरक्या हरियाणात लपल्याची टीप, नाशिक पोलिसांचे पथक पोहोचले अन्...
Shashi Tharoor on Congress : जिथं अज्ञानात आनंद मिळतो, तिथं शहाणपणा दाखवणं मूर्खपणाचं लक्षण! काँग्रेस आणि शशी थरुरांमध्ये चाललंय तरी काय?
जिथं अज्ञानात आनंद मिळतो, तिथं शहाणपणा दाखवणं मूर्खपणाचं लक्षण! काँग्रेस आणि शशी थरुरांमध्ये चाललंय तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Neelam Gorhe on Uddhav Thackeray : दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद, गोऱ्हेंचा ठाकरेंवर आरोप!Budget Session : 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 10 मार्चला अजित पवार मांडणार अर्थसंकल्पDelhi Marathi Sahitya Sammelan : साहित्याच्या मंचावर राजकीय,सामाजिक विषय नको, महामंडळाची भूमिकाCity 60 News : 23 Feb 2025 : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad : त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
Bacchu Kadu: ...तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
....तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
Nashik Crime : सोनाराच्या दुकानात तिघांकडून दिवसाढवळ्या दरोडा, टोळीचा म्होरक्या हरियाणात लपल्याची टीप, नाशिक पोलिसांचे पथक पोहोचले अन्...
सोनाराच्या दुकानात तिघांकडून दिवसाढवळ्या दरोडा, टोळीचा म्होरक्या हरियाणात लपल्याची टीप, नाशिक पोलिसांचे पथक पोहोचले अन्...
Shashi Tharoor on Congress : जिथं अज्ञानात आनंद मिळतो, तिथं शहाणपणा दाखवणं मूर्खपणाचं लक्षण! काँग्रेस आणि शशी थरुरांमध्ये चाललंय तरी काय?
जिथं अज्ञानात आनंद मिळतो, तिथं शहाणपणा दाखवणं मूर्खपणाचं लक्षण! काँग्रेस आणि शशी थरुरांमध्ये चाललंय तरी काय?
Jitendra Awhad : सुनील केदार, राहुल गांधींना एक न्याय, सत्ताधारी माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का? जितेंद्र आव्हाड आक्रमक
सुनील केदार, राहुल गांधींना एक न्याय, सत्ताधारी माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का? जितेंद्र आव्हाड आक्रमक
National Education Policy : काल कमल हसन म्हणाले, लोकांनी तमिळ भाषेसाठी लोकांनी जीव दिलाय, खेळ करू नका; आता सीएम स्टॅलिन म्हणाले, 'केंद्र सरकारने 10 हजार कोटी दिले तरी...'
काल कमल हसन म्हणाले, लोकांनी तमिळ भाषेसाठी लोकांनी जीव दिलाय, खेळ करू नका; आता सीएम स्टॅलिन म्हणाले, 'केंद्र सरकारने 10 हजार कोटी दिले तरी...'
Maha Shivaratri 2025 : महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी...
महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी...
Ladki Bahin Yojana : तिजोरीमधील पैसा संपत आल्यानेच लाडक्या बहिणीला निकष; आता केंद्रीय मंत्र्याचाच महायुती सरकारला घरचा आहेर!
तिजोरीमधील पैसा संपत आल्यानेच लाडक्या बहिणीला निकष; आता केंद्रीय मंत्र्याचाच महायुती सरकारला घरचा आहेर!
Embed widget