एक्स्प्लोर

Yavatmal News : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर; 'हे' आहे कारण

Yavatmal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ जिल्ह्यातील दौरा निश्चित झाला आहे. 28 फेब्रुवारीला पंतप्रधान यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

Narendra Modi on Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील दौरा निश्चित झाला आहे. 28 फेब्रुवारीला पंतप्रधान यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी  (PM Modi) हे दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहे. या मेळाव्यासाठी भारी परिसरात सुमारे 45 एकर जागेत या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणा या मेळाव्याच्या तयारीला लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 30 विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा यवतमाळ जिल्हासह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही केंद्रीय मंत्री देखील दौऱ्याच्या आदल्या दिवशीच, 27 फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दोन लाखांहून अधिक महिलांना करणार संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्यातील भारी शिवार येथे येणार असल्याने त्या अनुषंगाने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, प्रधान सचिव, अवर मुख्य सचिव यांनी आढावा सभा घेतली. या सभेला पालकमंत्री संजय राठोड, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक, विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, भाजपचे आमदार यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी पत्की यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सभेत सहभागी झाले. नियोजनाच्या दृष्टीने विविध 30 समित्या गठित करण्यात आल्या असून या मेळाव्याच्या तयारीला वेग आला आहे. शहरापासून 5 किमी अंतरावर असलेल्या भारी गावाजवळ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. साधारणपणे 45 एकरच्या विस्तीर्ण जागेवर ही सभा घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. जेसीबी मशीनने या जागेच्या सपाटीकरण सुरू आहे. 7 हेलिपॅडची निर्मिती जवळच असलेल्या विमानतळावर केली जात आहे. शिवाय विशेष रस्ता सुद्धा पंतप्रधान मोदींच्या आगमनासाठी तयार करण्यात येत आहे.

मागील महिन्यातही पंतप्रधान आले होते महाराष्ट्र दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिन्यातही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. आगामी निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक, मुंबई आणि सोलापूर येथे दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. मुंबईमध्ये अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आलं होतं. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक इथं आयोजित 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवालाही हजर राहिले होते. त्यानंतर पंतप्रधान  सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते 15 हजार घरकुलांचं लोकार्पण करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा महाराष्ट्र सोबतच यवतमाळच्या देखील  चौथ्यांदा दौऱ्यावर येत आहेत. 

पंतप्रधान चौथ्यांदा यवतमाळ दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा यवतमाळ जिल्हाच्या दौऱ्यावर येत आहेत. 2004  मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते यवतमाळला आले होते. त्यांची जाहीर सभा पोस्टल ग्राउंडवर झाली होती. यानंतर 20 मार्च 2014 ला लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्णीजवळ असलेल्या दाभडी येथे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी ‘चाय पे चर्चा’तून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी 16 फेब्रुवारी 2019  रोजी यवतमाळच्या पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी देखील ते आले होते. आता पुन्हा पंतप्रधान मोदी हे यवतमाळ येथे येत असल्याने महाराष्ट्र आणि यवतमाळ येथे येण्याची ही पंतप्रधानांची चौथी वेळ आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
Sayyed Hassan Nasrallah Assassination : इस्त्रायलच्या हल्ल्यात 'हिजबुल्लाह'चा नसराल्लाह मारला गेला, मृतदेह सापडला, पण शरीरावर एकही जखम नाही! मग कशाने मृत्यू ओढवला?
इस्त्रायलच्या हल्ल्यात 'हिजबुल्लाह'चा नसराल्लाह मारला गेला, मृतदेह सापडला, पण शरीरावर एकही जखम नाही! मग कशाने मृत्यू ओढवला?
Maharashtra School uniform quality: एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या चेष्टेचा हिशेब रोहित पवारांनी चुकता केला, शालेय गणवेशाच्या क्वालिटीचा मुद्दा तापला
एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या चेष्टेचा हिशेब रोहित पवारांनी चुकता केला, शालेय गणवेशाच्या क्वालिटीचा मुद्दा तापला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishwa Hindu Parishad : शेख सुभान अली यांच्या वक्तव्यामुळे शिवभक्तांचा अपमान - विश्व हिंदू परिषदRamabai Nagar Redevelopment : मंत्रिमंडळाच्या बैठकीत रमाबाईनगर पुनर्विकासाचा निर्णयTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaNarhari Zirwal Protest :  आदिवासींमधून धनगरांना आरक्षण देण्याचा जीआर मागे घेण्याची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
Sayyed Hassan Nasrallah Assassination : इस्त्रायलच्या हल्ल्यात 'हिजबुल्लाह'चा नसराल्लाह मारला गेला, मृतदेह सापडला, पण शरीरावर एकही जखम नाही! मग कशाने मृत्यू ओढवला?
इस्त्रायलच्या हल्ल्यात 'हिजबुल्लाह'चा नसराल्लाह मारला गेला, मृतदेह सापडला, पण शरीरावर एकही जखम नाही! मग कशाने मृत्यू ओढवला?
Maharashtra School uniform quality: एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या चेष्टेचा हिशेब रोहित पवारांनी चुकता केला, शालेय गणवेशाच्या क्वालिटीचा मुद्दा तापला
एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या चेष्टेचा हिशेब रोहित पवारांनी चुकता केला, शालेय गणवेशाच्या क्वालिटीचा मुद्दा तापला
मुस्लीम मावळ्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा भगवा समुद्रात फडकावला, सुभान अलींच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक
मुस्लीम मावळ्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा भगवा समुद्रात फडकावला, सुभान अलींच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक
कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार, सरकारने कारवाईचा बडगा उगारतचा सीईओ गुपचूप सागर बंगल्यावर पोहोचले पण...
कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार, सरकारने कारवाईचा बडगा उगारतचा सीईओ गुपचूप सागर बंगल्यावर पोहोचले पण...
Navratri 2024: नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
Uddhav Thackeray : रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
Embed widget