एक्स्प्लोर

Old Pune-Mumbai highway Accident : काका पाणी द्या ना..! डोळ्या देखत बस दरीत गेली, लेकरांचा जीव वाचला पण ॲम्ब्युलन्समध्ये पाणी दिलं नाही; नेमकं काय घडलं?

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. अपघातानंतर बचावकार्य सुरु झालं. याबचावकार्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Old Pune-Mumbai highway Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळून भीषण अपघात झाला. अपघातानंतर बचावकार्य सुरु झालं. या बचावकार्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अपघातातून बचावलेले तीन मुलं रेक्यू टीमच्या एका कर्मचाऱ्याला पाणी मागत आहे. मात्र टीमने पाणी न देता त्यांची समजूत काढल्याचं देखील या व्हिडीओत दिसत आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळून भीषण अपघात झाला. बसमध्ये एकूण 42 प्रवासी होते. हे सगळे प्रवाशी ढोल ताशा पथकाच्या वादनासाठी पुण्यात आले होते. हा कार्यक्रम आटपून मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्याच दरम्यान त्यांच्या बसचा ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली. हा घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात झाली मागील अनेक तास बचावकार्य सुरु आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे?

बचावकार्य सुरु असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अपघातामुळे तीन लहान मुलं घाबरलेल्या अवस्थेत आहे. घाबरल्यामुळे ते तहानेने व्याकूळ झाले होते. त्यामुळे रुग्णवाहिकेजवळ असलेल्या बचावकार्य करत असलेल्या कर्मचाऱ्यांकडे पाण्याची मागणी करत आहे. काका प्यायला पाणी द्या, अशी मागणी पाणावलेल्या डोळ्यांनी ते करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मात्र या बचावकार्य करत असलेल्या व्यक्तीने मुलांची समजून काढून पाच मिनीटांवर दवाखाना आहे. दवाखान्यात गेल्यावर पाणी मिळेल, असं सांगत त्यांनी समजून काढली. मात्र मुलं वारंवार पाण्याची मागणी करत असल्याचं दिसत आहे. 

पाणी का दिलं नाही ?

या बचावकार्य करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी या तिनही मुलांना पाणी दिलं नाही. साधारण अचानक पडलेल्या किंवा अपघात झालेल्या व्यक्तीला लगेच पाणी देऊ नये, असा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे या तिघांचीही समजून काढून त्यांना थेट रुग्णालयात हलवण्यात आलं.

जय बजरंगबलीचा नारा देत बचावकार्याला केली सुरुवात...

अपघात झाल्याची माहिती मिळ्यानंतर हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम यांनी बचावकार्य सुरु केलं. अपघाताची तीव्रता बघून तेदेखील हादरले. बस दरीत कोसळल्याचं पाहून त्यांनी लगेच बचावकार्याला सुरुवात केली. त्यापूर्वी या सगळ्या कर्मचाऱ्यांनी बजरंग बली की जय असा नारा दिला होता. या अपघातात 13 वादकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 28 इतर वादकांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सIran Attacks Israel Special Report : इराण आणि इस्रायल युद्धाचे आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम?Zero Hour Varanasi Sai Baba Idol : वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारण तापलंVaranasi Sai Baba : साईंसाठी महाराष्ट्र एकवटला; साईंच्या मूर्तींबद्दल कोणता आक्षेप? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
Embed widget