(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Gadkari : गडकरी म्हणतात, ''विमानंही उतरू शकतील असे 20 रस्ते मी देशात बांधले!"
मी देशात असे 20 रस्ते बांधले जिथे विमानं देखील उतरू शकतं. केंद्राकडून एक लॉजीस्टिक पार्क बांधणार आहोत, ज्या रस्त्यावर विमान देखील उतरेल
मुंबई : "मी देशात असे 20 रस्ते बांधले जिथे विमान देखील उतरू शकतात. सांगलीतही (sangali) एक लॉजीस्टिक पार्क बांधणार आहोत, ज्या रस्त्यावर विमानं देखील उतरतील" असे वक्तव्य केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना केले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प (budget) नुकताच सादर झाला असून, याच पार्श्वभूमीवर नवीन अर्थसंकल्पीय दृष्टीकोनातून 'महाराष्ट्राच्या विकास वाटा' चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते, या कार्यक्रमाला मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री राज्यमंत्री भागवत कराड (bhagawat karad), आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी (lalit gandhi) उपस्थित होते.
''देशात असे 20 रस्ते बांधले, जिथे विमानंही उतरू शकतात''
गडकरी पुढे म्हणाले, सर्व महाराष्ट्राचा आपण विचार केला पाहिजे. मी राज्यात 5 लाख कोटींचे रस्ते बनवले. राज्याचा विकास झाला पाहिजे पण केवळ वरवरून काम चालणार नाही. जर काम करायचे असेल तर गंभीरपणे केले पाहिजे. मी देशात असे 20 रस्ते बांधले जिथे विमानं देखील उतरू शकतं. केंद्राकडून सांगलीत एक लॉजीस्टिक पार्क बांधणार आहोत, ज्या रस्त्यावर विमान देखील उतरेल. 1947 साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 75 टक्के लोक गावात राहत होती. मात्र आता 25 टक्के लोकं राहतात. गावात सोयीसुविधा आणि साधन नसल्याने ना नाईलाजाने लोक शहरात आली आहेत. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागाची परिस्थिती खराब आहे, तीच परिस्थिती गडचिरोली जिल्ह्याची आहे.
मका आणि तांदूळ पासून इथेनॉल बनवण्याची परवानगी
आज देशात साडे चारशे कोटी इथोनॉलची गरज आहे. पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल टाकण्यासाठी देखील नाही. पेट्रोलवर चालणारी वाहने आता 100 टक्के बायो इथेनॉलवर चालू शकतात. आता आम्ही मका आणि तांदूळ पासून इथेनॉल बनवण्याची परवानगी दिली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची मुख्य समस्या म्हणजे आपण आपली पॉवर खर्च करत आहोत.
मुंबईत इलेक्ट्रॉनिक बसबाबत गडकरी म्हणाले....
मुंबईत इलेक्ट्रॉनिक बस घ्याव्यात यासाठी मी 3 वर्ष मागे लागलो, आता आदित्य ठाकरे यांनी त्या घेतल्या. इलेक्ट्रॉनिक बसला एका किलोमीटरला 50 रुपये खर्च होतो तर डिझेल बसला 110 रुपये खर्च होतो. माझ्याकडे इलेक्ट्रिक कार आहे. काही त्रास होत नाही. देशात वॉटर टॅक्सी सुरू करायच्या आहेत. ज्या दक्षिण मुंबईतून 13 मिनिटात नवी मुंबई एअरपोर्टला जातील