![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Garba: 'गरबा उत्सवात आधार कार्ड तपासूनच प्रत्येकाला प्रवेश द्या'; विश्व हिंदू परिषदेची मागणी
Navratri 2022 : नवरात्रीमध्ये गरबा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या गरबा उत्सवासंदर्भात विश्व हिंदू परिषदेनं (Vishwa Hindu Parishad) एक मागणी केली आहे.
![Garba: 'गरबा उत्सवात आधार कार्ड तपासूनच प्रत्येकाला प्रवेश द्या'; विश्व हिंदू परिषदेची मागणी Navratri 2022 Garba Utsav VHP Demand Allow entry to Garba festival after verifying Aadhaar card Garba: 'गरबा उत्सवात आधार कार्ड तपासूनच प्रत्येकाला प्रवेश द्या'; विश्व हिंदू परिषदेची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/14/ad6e635e528d2dca7774d938cf956e281663151533872538_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Navratri 2022 : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला (Shardiya Navratri 2022) सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे. कारण कोरोनामुळं गेले दोन वर्ष निर्बंध असलेला हा उत्सव यंदा निर्बंधमुक्त स्वरुपात होतोय. नवरात्रीमध्ये गरबा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या गरबा उत्सवासंदर्भात विश्व हिंदू परिषदेनं (Vishwa Hindu Parishad) एक मागणी केली आहे.
गरबा हा श्रद्धेचा आणि उपासनेचा विषय असून सार्वजनिक इव्हेंट नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश द्याआणि त्यासाठी आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने गरबा उत्सव आयोजन करणाऱ्यांना मंडळांना केली आहे.
गरबा उत्सवात श्रद्धा नसतानाही अनेक इतर धर्मीय प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात. पुढे लव्ह जिहाद सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आत्ताच काळजी घेतलेली बरी असा विश्व हिंदू परिषदेचा या मागणी मागचा तर्क आहे.
यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने विदर्भात अनेक ठिकाणी गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांची भेट घेतली आहे, तर पोलीस अधिकाऱ्यांशी भेटणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत प्रमुख गोविंद शेंडे यांनी दिली आहे.
गरज भासल्यास विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते गरबा उत्सव आयोजन स्थळे उभे राहून मंडळांना मदत करतील, आयोजन मंडळ आणि पोलिसांनी यात पुढाकार घ्यावा असे शेंडे म्हणाले.
नवरात्रीत गरबा का खेळला जातो?
सध्याच्या काळात गरब्यामध्ये एक स्पर्धेचं किंवा फॅशनचं युग जरी आलं असलं तरी मात्र, देवीच्या दरबारात गरबा खेळण्याला एक धार्मिक महत्त्व आहे. माते अंबेने महिषासुराचा वध केला असे मानले जाते. महिषासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळाल्यावर लोकांनी नृत्य केले. या नृत्याला लोक 'गरबा' (Garba) म्हणून ओळखले जाते. माँ अंबे यांना हे नृत्य खूप आवडते अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळेच मातेची स्थापना केल्यानंतर श्रद्धेने गरबा करण्याची परंपरा सुरू आहे. यामुळे माता प्रसन्न होते, असे देखील मानले जाते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)