एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Narayan Rane : पवारांना मोदी विरोधाची कावीळ, त्यांना मोदींचे चांगले काम दिसत नाही; नारायण राणेंची टीका

Narayan Rane On Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्याचा विरोध केला, ते पवारांना झोंबायचं कारण नाही असं नारायण राणे यांनी म्हटलं. 

मुंबई नरेंद्र मोदींनी इस्त्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता, त्यांनी पॅलेस्टिनचा विरोध केला नाही, शरद पवारांना (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चांगले काम केलेलं दिसत नाही का असा थेट सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी विचारला. शरद पवार हे काही लोकांना वाचवण्यासाठी ना देशाच्या हिताचे बोलतात ना समाजाच्या हिताचे अशी टीकाही त्यांनी केली. शरद पवारांना मोदी विरोधाची कावीळ झाल्याने त्यांनी केलेली चांगली काम त्यांना दिसत नाहीत असे नारायण राणे म्हणाले. 

मी 96 कुळी मराठा आहे, कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही असं पुनरूच्चार केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)  यांनी केला आहे. मराठा आणि कुणबी हे (Kunbi Certificate) दोन वेगवेगळे आहेत, मी आयुष्यात कुणबी दाखला (Marath Reservation) घेणार नाही असंही ते म्हणाले. 

1993 सालच्या बाँबस्फोटात तेरावा बाँबस्फोट मशिदीत झालाच नव्हता, मग त्यावर त्यावेळचे मुख्यमंत्री खोटं का बोलले? एका ठराविक समूदायाच्या लोकांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न त्यांनी का केला? असा सवाल नारायण राणे यांनी विचारला. 

काय म्हणाले नारायण राणे?

पवार यांनी इस्त्रालय आणि हमास बाबत केलेली टीका चुकीची आहे. इस्त्रायलवर दहशतवादी हल्ल्याबाबत मोदींनी भूमिका मांडली होती. पॅलेस्टिनविरोधातली ती भूमिका नव्हती. शरद पवारांनी देशात आणि राज्यात बरीच पदं भूषवली आहेत. मला त्यांना आठवण करुन द्यायची आहे की 1992 ला साखळी बाॅम्बस्फोटात अनेक मृत्यू झालेत, तेव्हा मशिदीमध्ये खोटा बाॅम्बस्फोट झाला अशी अफवा त्यांनी पसरवली? पवार साहेब देश प्रथम अशी भूमिका कधी घेणार आहेत? 

केंद्र सरकारनं जुलै 1993 मध्ये एन.एन.व्होरा यांची समिती नेमली. या समितीने दाऊद आणि मेमन गॅंगचे राजकारण्यांशी त्यांचे सुमधूर संबंध असल्याचं अहवालात सांगितलं होतं.पवार साहेबांना माहिती आहे त्यात कोणाकोण होतं ते. व्होरा समितीत काँग्रेसच्या नेत्यांची दाऊदशी संबंध असलेली नावं आहेत. मी काँग्रेसमध्ये असताना नावं देखील सांगितली होती. पवार साहेब तुम्ही अशा वेळेला बोलता जे जनतेच्या हिताचं ना राष्ट्राच्या हिताचं असतं.  

जनतेला वाहून घेतलेल्या लोकांवर तुम्ही टीका करता. गेल्या 9 वर्षात 55 योजना मोदींनी जाहीर केलेल्या आहेत. असं असताना मोदी आपल्याला गुरु मानतात तरीही आपण असं वागता? आपण समजून घ्या… तुम्ही हमासची बाजू घेता आहात. व्होरा समितीची मी माहिती काढली, चांगल्याला चांगलं म्हणणं अभिप्रेत आहे. आम्ही टीका ऐकणाऱ्यामधले नाही, जशास तसे उत्तर दिलं जाईल. पवार आता कोणत्या क्षेत्रासाठी कामं करतायत? आता ते फक्त पार्टी वाचवण्याचं ते काम करतायत. बाॅम्बस्फोट त्यांच्याच कार्यकाळात का होतात? यासंदर्भात संशोधन करायला हवं. दहशतवादाविरोधात आम्ही कोणत्याही देशाला मदत करण्यास तयार आहे. 

आदित्य ठाकरेंवर काय म्हणाले नारायण राणे? 

आदित्य ठाकरेंचे राज्यासाठी काय योगदान आहे? वकिलांनी त्यांना नीट ॲडव्हाईस केली नाही.  

मराठा आरक्षणावर काय म्हणाले नारायण राणे? 

मराठा आणि कुणबी याच्यात फरक आहे. मनोज जरांगे यांनी घटनेचा अभ्यास करावा. जातीला किंवा वर्गाला आरक्षण देताना घटनेचा अभ्यास करावा लागतो. मी भरपूर अभ्यास केला आहे, त्यामुळे मला माहिती आहे घटना काय सांगते. मी मराठा आहे, मला कुणबी प्रमाणपत्र नको. कुठलाही मराठा, कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. 

VIDEO : मी आयुष्यात कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही: नारायण राणे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, ताप आल्यानं आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्लाAjit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझाMahayuti Oath Ceremony :  5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधीUddhav Thackeray On Mahayuti :विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही-ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Embed widget