News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार म्हणतात, मंत्रीपदाची ऑफर होती पण...

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र भुयारांना मंत्रिपद मिळत असताना राजू शेट्टी यांनी मिळू दिलं नाही, असा आरोप केला होता.

त्यावर स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना खुलासा केला आहे.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : महाविकास आघाडीकडून मंत्रीपदाची ऑफर होती. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एका मंत्रिपदाची ऑफर होती. मात्र त्यावेळी संघटनेने काही भूमिका घेतली नाही. मंत्रिपद मिळालं असतं तर माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असता, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना म्हटलं आहे. ते म्हणाले की, मंत्रिमंडळात मंत्रिपदाची ऑफर होती. मात्र त्यावेळी राजू शेट्टी आणि संघटनेने कुठलीही भूमिका घेतली नाही. अर्थात यामुळं मी राजू शेट्टी किंवा संघटनेवर आजिबात नाराज नाही, कारण शेवटी ती संघटनेची भूमिका आहे. मी शेवटपर्यंत माझा मतदारसंघ आणि शेतकऱ्यांसाठी काम करत राहील, असंही भुयार यांनी म्हटलं आहे. आज आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र भुयारांना मंत्रिपद मिळत असताना राजू शेट्टी यांनी मिळू दिलं नाही, असा आरोप केला आहे. त्यावर बोलताना भुयार यांनी ही प्रतिक्रिया दिली. आंदोलनावरून खोत-शेट्टी भिडले, खोत म्हणतात, 'हे काजू शेट्टी' तर शेट्टी म्हणाले, 'खोत भ्रमिष्ट झाले' काय म्हणाले होते सदाभाऊ खोत  काल सदाभाऊ खोत यांनी आरोप करत म्हटलं होतं की, राजू शेट्टी आता हे काजू शेट्टी झाली आहेत आणि या भंपक माणसाला आता कोणी किंमत देत नाही. तसेच त्यांची अवस्था आता गावात देवाला सोडलेल्या वळू प्रमाणे झालेली आहे. शेतकऱ्यांनी शेट्टी यांना रेड्याप्रमाणे सोडले आहे. त्यामुळे आता काय करावं आणि काय नाही, हे सुचत नाही.या उलट राजू शेट्टी यांनी दूध दराच्या आंदोलनाचं नाटक केले आहे. बारामतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पायी गेलो आणि त्याच ठिकाणी राजू शेट्टी मात्र आपल्या आमदारकीसाठी पाय चाटायला गेले. मात्र अजूनही राष्ट्रवादीने त्यांना आमदारकी दिलेली नाही. कारण राजू शेट्टी जाईल तिथे खंजीर खुपसतात हे त्यांना माहित आहे", अशी टीका खोत यांनी केली आहे. तसेच मला कोंबडीचोर म्हणणाऱ्या राजू शेट्टींनी चारशे एकर जमीन घेऊन ठेवली आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद मिळणार होतं. मात्र राजू शेट्टी यांनी स्वतःला मंत्रीपद हवे असल्याने भुयार यांना मंत्री पद मिळू दिले नाही, असा आरोप खोत यांनी केला आहे. BLOG | सत्तेपायी मैत्री तुटली! या राजकारणाने चळवळीचा इस्कोट केला! कोण आहेत देवेंद्र भुयार विधानसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले आमदार देवेंद्र भुयार. मोर्शी मतदारसंघातून भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवत चक्क राज्याच्या कृषीमंत्र्यांचाच पराभव केला. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलनं करणाऱ्या भुयारांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करत विधानसभा गाठली. रुडमधील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेले देवेंद्र भुयार यांनी चळवळीच्या माध्यमातून हे यश मिळवले. त्यांचे आई वडील हे शेतकरी. भुयार यांच्या या यशाने पश्चिम महाराष्ट्रात असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भात चांगले पाय रोवत आहे. शेतकरी, जनसामान्यांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला जेरीस आणणाऱ्या युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांना 2016 मध्ये दोन वर्षांच्या तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. भुयार यांच्या राजकारणाची सुरवात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यासोबत झाली होती. प्रहारमधून पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य असा प्रवास झाल्यानंतर आता ते जायंट किलर ठरून आमदार झाले आहेत. शेतकऱ्याच्या पोराकडून कृषीमंत्र्यांचा पराभव, 'स्वाभिमानी' किसानपुत्र देवेंद्र भुयार विधानसभेत
Published at : 02 Aug 2020 10:07 AM (IST) Tags: mla devendra bhuyar sadabhau khot Raju Shetti Maharashtra Politics

आणखी महत्वाच्या बातम्या

10 ते 12 जणांनी केली तरुणाला बेदम मारहाण, उपचारदरम्यान मृत्यू, धक्कादायक घटनेनं धुळे हादरलं  

10 ते 12 जणांनी केली तरुणाला बेदम मारहाण, उपचारदरम्यान मृत्यू, धक्कादायक घटनेनं धुळे हादरलं  

Maharashtra Live Updates:ऐन दिवाळीत राज्यभर पावसाचे इशारे, कुठे काय स्थिती?

Maharashtra Live Updates:ऐन दिवाळीत राज्यभर पावसाचे इशारे, कुठे काय स्थिती?

धक्कादायक! भाऊबीजेच्या तोंडावर भावा-बहिणीवर काळाचा घाला, आयशर टेम्पोच्या धडकेत कोल्हापुरात तिघांचा मृत्यू

धक्कादायक! भाऊबीजेच्या तोंडावर भावा-बहिणीवर काळाचा घाला, आयशर टेम्पोच्या धडकेत कोल्हापुरात तिघांचा मृत्यू

यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?

यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?

Dattatray Bharane: मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा

Dattatray Bharane: मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा

टॉप न्यूज़

Tata Trust : टाटा ट्रस्टमध्ये मतभेद असताना मोठी अपडेट, वेणू श्रीनिवास यांची आजीव ट्र्स्टी म्हणून निवड, मेहली मिस्त्रींचं काय होणार

Tata Trust : टाटा ट्रस्टमध्ये मतभेद असताना मोठी अपडेट, वेणू श्रीनिवास यांची आजीव ट्र्स्टी म्हणून निवड, मेहली मिस्त्रींचं काय होणार

Muhurat Trading:मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीवर काय घडलं? सर्वाधिक फायदा अन् फटका कुणाला? जाणून घ्या

Muhurat Trading:मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीवर काय घडलं? सर्वाधिक फायदा अन् फटका कुणाला? जाणून घ्या

Rajiv Deshmukh Passes Away: माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी

Rajiv Deshmukh Passes Away: माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी

BCCI : आशिया कपची ट्रॉफी भारताला द्या, बीसीसीआयचा मोहसीन नक्वीला इशारा, मागणी मान्य न केल्यास पुढचं पाऊल टाकणार 

BCCI : आशिया कपची ट्रॉफी भारताला द्या, बीसीसीआयचा मोहसीन नक्वीला इशारा, मागणी मान्य न केल्यास पुढचं पाऊल टाकणार