एक्स्प्लोर

शेतकऱ्याच्या पोराकडून कृषीमंत्र्यांचा पराभव, 'स्वाभिमानी' किसानपुत्र देवेंद्र भुयार विधानसभेत

मोर्शी मतदारसंघातून भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवत चक्क राज्याच्या कृषीमंत्र्यांचाच पराभव केला. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलनं करणाऱ्या भुयारांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करत विधानसभा गाठली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील आठ मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मंत्र्यांना पराभूत करणारे जायंट किलर सध्या चर्चेचे विषय ठरले आहेत. यात खास आकर्षणाचे केंद्र ठरले ते नवनियुक्त आमदार देवेंद्र भुयार. मोर्शी मतदारसंघातून भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवत चक्क राज्याच्या कृषीमंत्र्यांचाच पराभव केला. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलनं करणाऱ्या भुयारांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करत विधानसभा गाठली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र भुयार यांच्यावर मतदानाच्या दिवशी अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. तसेच त्यांची चारचाकी वाहन पेटविली होती. या घटनेमुळे त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले होते. वरुडमधील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेले देवेंद्र भुयार यांनी चळवळीच्या माध्यमातून हे यश मिळवले आहे.  त्यांचे आई वडील हे शेतकरी. भुयार यांच्या या यशाने पश्चिम महाराष्ट्रात असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भात चांगले पाय रोवत आहे. शेतकरी, जनसामान्यांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला जेरीस आणणाऱ्या युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांना 2016 मध्ये दोन वर्षांच्या तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. भुयार यांच्या राजकारणाची सुरवात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यासोबत झाली होती. या विधानसभेला देखील बच्चू कडू यांनी त्यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. भुयार अनेक आंदोलनासाठी चर्चेत राहिले.  प्रहारमधून पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य असा प्रवास झाल्यानंतर आता ते जायंट किलर ठरून आमदार झाले आहे. देवेंद्र भुयार आमदार झाल्यानंतर स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भावनिक पोस्ट लिहित त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शेट्टी यांनी म्हटलं आहे की, आज पुन्हा मला 2004 सालातील आठवणींची पुनरावृत्ती झाली. 1988 सालापासून मी शेतकरी चळवळीला सुरवात केली. 'मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया' याप्रमाणे चळवळीला उभारी मिळत गेली. 1996 साली स्वर्गीय शरद जोशी यांचे मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलने यशस्वी होऊ लागली. यामुळे 2002 साली मी सावकर मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील उदगाव जिल्हा परिषद मधून निवडणूक लढविली. या चळवळीच्या जोरावर मी उदगांव जिल्हा परिषद मधून जिल्हा परिषदेचा सदस्य झालो. दिड एकर जमीन असलेला मी अल्पभूधारक शेतकरी याच चळवळीच्या जोरावर 2004 साली मी विधानसभेचा सदस्य झालो. 'एक व्होट व एक नोट' यापध्दतीने राज्यात निवडणुकीत आदर्श निर्माण करत चांगल्या मताधिक्याने निवडून आलो, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. आज तब्बल 15 वर्षांनी तसाच अनुभव देवेंद्र भुयार यांच्या बाबतीत आला. वयाच्या 23 व्या वर्षापासून चळवळीचे वेड लागलेला अल्पभूधारक कुटुंबातील देवेंद्रही शेतकरी आंदोलनातून 2012 साली पंचायत समिती सदस्य व 2017 साली जिल्हा परिषद सदस्य झाला. घरावर तुळशीपत्र ठेवून अत्यंत आक्रमकपणे शेतकरी आंदोलनात स्वत:ला झोकून देऊन काम केल्याने वरूड मोर्शी विधानसभा मतदारसंघातून प्रत्येक घटकातील, पक्षातील , समाजातील माणूस एकवटून देवेंद्र भुयारांना 'एक व्होट व एक नोट' यापध्तीने लोकांनी राज्याच्या कृषीमंत्र्याच्या विरोधात मताधिक्याने निवडून दिले. देवेंद्रच्या विजयानिमित्त आज तरूणाईमध्ये जो उस्फुर्त जल्लोष व प्रतिसाद पाहिल्यांनतर निश्चितच विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व चळवळीचे बळ वाढविण्यासाठी विदर्भातील 'रेशीमबागेपासून' जनतेने दिलेला हा कौल निश्चितच चळवळीला दिशा देणारा आहे हे नक्की. आजचा हा उत्साह पाहिल्यानंतर माझ्या देवेंद्रकडून इतकीच अपेक्षा की 'दुर्बिणीने शोधून सुध्दा हाताला कोणताही डाग लावून न घेता, तू या चळवळीला बळ दे', असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election 2026: गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
अमेरिकेच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
Satara District Bank Election Result 2026: राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
Maharashtra District bank Election Result 2026: सातारा आणि सांगली, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
सातारा आणि सांगली, नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी

व्हिडीओ

Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Payal Pawar Zhambre Death Case Pune: पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
Barack Obama US Midterm Elections Result 2026: मोठी बातमी : डोनाल्ड ट्रम्प हरले, बराक ओबामा म्हणाले, ही तर फूट पाडणाऱ्यांना चपराक, अमेरिकेच्या एकीचा विजय
मोठी बातमी : डोनाल्ड ट्रम्प हरले, बराक ओबामा म्हणाले, ही तर फूट पाडणाऱ्यांना चपराक, अमेरिकेच्या एकीचा विजय
Pradeep Purnekar Case Shrikant Shinde on: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात शिवसेनेची इमेज डागाळली, श्रीकांत शिंदेंनी प्रवक्त्यांना नंदनवन बंगल्यावर बोलावून घेतलं, नाराजी व्यक्त करत महत्त्वाचे आदेश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात शिवसेनेची इमेज डागाळली, श्रीकांत शिंदेंनी प्रवक्त्यांना नंदनवन बंगल्यावर बोलावून घेतलं, नाराजी व्यक्त करत महत्त्वाचे आदेश
Gokul Election 2026: गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
अमेरिकेच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल, LIVE
अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल LIVE
PM Modi and Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Embed widget