Malegaon Blast : एटीएसकडून योगी आदित्यनाथांसह संघाच्या नेत्यांना फसवण्यासाठी दबाव, मालेगाव बॉम्बस्फोटातील साक्षीदाराचा गौप्यस्फोट
महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना फसवण्यासाठी धमकी दिली होती असे साक्षीदाराने सांगितले
Malegaon Blast: मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Blast) प्रकरणातील एका साक्षीदाराने विशेष एनआयए (NIA) कोर्टापुढे साक्ष देताना केलेल्या एका खुलाशामुळे कोर्टातील सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसाला. सुनावनीवेळी या साक्षीदाराने सांगितले की, महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, स्वामी असीमानंद आणि इंद्रेश यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना फसवण्यासाठी धमकी दिली होती.
साक्षीदाराची साक्ष एकून कोर्टातील सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला. याच प्रकरणातील एक आरोपी असलेल्या समीर कुलकर्णी याने एका वृत्तवाहिनीला साक्षीदाराने केलेल्या खुलाशाची माहिती दिली. कुलकर्णी याने सांगितले की, "तत्कालीन एटीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी त्याच्यावर दबाव आणत या प्रकरणातील योगी आदित्यनाथ यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार, स्वामी असीमानंद, काकाजी आणि देवधर यांची नावे घेण्यास सांगितले होते. अशी माहिती साक्षीदाराने कोर्टाला दिली.
"साक्षीदाराला सर्वात आधी एटीएसच्या मुंबई आणि पुण्यातील कार्यालयात बेकायदेशीरपणे थांबवून ठेवले होते. त्याच्यावर दबाव आणत त्याला धमकीही देण्यात आली होती. जर त्याने संघाच्या पाच लोकांची नावे घेतली नाहीत तर त्याला सोडण्यात येणार नाही. शिवाय याचे वाईट परिणाम भोगावे लागतील" अशी माहिती संबंधित साक्षीदाराने कोर्टाला दिली.
दरम्यान, या प्रकरणातील 15 व्या साक्षीदाराने आपला पाच पानांचा जबाब काल एनआयए कोर्टात सादर केला.
काय झालं होतं मालेगावमध्ये 2008 ला?
29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी मालेगावमध्ये शकील गुड्स ट्रांसपोर्टच्या समोर एक बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात सहा लोकांचा मृत्यू झाला होता. तर 101 लोक जखमी झाले होते. स्फोटानंतर 30 सप्टेंबर रोजी मालेगावच्या आझाद नगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता.
महत्वाच्या बातम्या
Malegaon blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 15 वा साक्षीदार फुटला ABP Majha
मालेगाव ब्लास्ट 2008 खटला; नियमित सुनावणीसाठी गैरहजर राहण्यासाठीचा साध्वी प्रज्ञा यांचा अर्ज विशेष कोर्टाने स्वीकारला