एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update : राज्यात आठवड्याच्या शेवटी मुंबईसह 'या' भागात पावसाची शक्यता, IMD ची माहिती, हवामानाचे ताजे अपडेट पाहा

Maharashtra Weather Update : हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात मुंबईसह, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे, अधिक माहिती जाणून घ्या.

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) काल मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या आठवड्याच्या शेवटी मुंबईत अवकाळी पावसाची शक्यताही भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर मुंबईत 25 आणि 26 नोव्हेंबरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम देशातील हवामानावर दिसून येत आहे. राज्यासह देशातील वातावरण बिघडले आहे. येत्या 24 तासांत देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

याशिवाय मुंबईत एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह (ताशी 30 ते 40 किमी) पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पावसानंतर शहरातील हवेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. शक्यता आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चच्या आकडेवारीनुसार, पूर्वेकडील वारे पश्चिमेकडे सरकत आहे, ज्यामुळे तामिळनाडू किनारपट्टीवर पाऊस पडत आहे. तो लवकरच केरळ आणि आसपासच्या भागात पोहोचेल.

25 ते 26 नोव्हेंबर दरम्यान मुंबईत पावसाची शक्यता

दरम्यान, 25 ते 26 नोव्हेंबर दरम्यान मुंबईत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज 24 नोव्हेंबरलाही ढगाळ वातावरण राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहरात चांगला पाऊस होऊ शकतो. 27 नोव्हेंबरला पाऊस कमी होऊ शकतो. बुधवारी मुंबईचा हवेचा दर्जा निर्देशांक 122 होता, जो 'मध्यम' श्रेणीचा आहे. यापूर्वी 9 नोव्हेंबरला मुलुंड, मालाड आणि गोरेगाव कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला होता.

महाराष्ट्रातील 'या' भागातील पावसाची स्थिती

रत्नागिरी जिल्ह्याला आजपासून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

नागपूर जिल्ह्यात पुढील चार दिवस आकाश आंशिक ढगाळ आणि हवामान कोरडे राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील ५ दिवसादरम्यान, कमाल तापमान 31.9 ते 32.4 अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान 16.6 ते 17.0 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात देखील पुढील पाच दिवस आंशिक ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget