Konkan Railway : कोकणात गणेशोत्सवानिमित्त धावणार 'मोदी एक्स्प्रेस' विशेष गाड्या; मुंबई भाजपकडून पुढाकार
Konkan Railway : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मुंबई भाजपाकडून मोदी एक्सप्रेस रेल्वे सोडण्यात येणार आहे. 28 ऑगस्टला दादर स्थानकावरून ही 'मोदी एक्स्प्रेस' कोकणात धावणार आहे.
Konkan Railway : कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सवानिमित्त कोकणी माणूस दरवर्षी आवर्जून गावी जात असतात. मात्र, यासाठी त्यांना फारच तारांबळ करावी लागते. गेल्या वर्षी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या पुढाकाराने मुंबईतून कोकणसाठी 'मोदी एक्स्प्रेस' सोडण्यात आली होती. यावर्षी मुंबई भाजपच्या पुढाकाराने मोदी एक्स्प्रेस ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. 28 ऑगस्टला सकाळी 10 वाजता दादर सावंतवाडी एक्सप्रेस (Dadar-Sawantwadi Express) सुटणार आहे. भाविकांना घेऊन ही गाडी चिपळूण (Chiplun), रत्नागिरी (Ratnagiri), कणकवली (Kankavli) तसेच सावंतवाडी (Sawantwadi) या स्थानकांवर थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसचा खर्च भाजप मुंबईकडून उचलला जाणार आहे.
अशी असेल बुकिंगची प्रक्रिया :
मुंबईतील प्रत्येक मंडलमधून कोकणात जाणाऱ्या 50 प्रवाशांची नावे (नाव, वय तसेच मोबाईल क्रमांक या स्वरूपात) मंडल तसेच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून नोंदवायची आहे. यासाठी नोंदणी प्रत्येकी 100 रुपये शुल्क ठरविण्यात आले आहे. दरवर्षी कोकणात गणेशोत्सव काळात विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. मात्र, गणेशोत्सव काळात सर्वच रेल्वे गाड्यांचं बुकिंग अगोदरच फुल झालं आहे. त्यात वाढलेले तिकिटांचे दरही चाकरमान्यांना परवडणारे नाहीत. मात्र, यावर्षी मुंबई भाजपच्या वतीने 100 रुपयांचा चाकरमान्यांना गावी येता येणार आहे. त्यासाठी चाकरमान्यांना आधी बुकिंगही करावं लागणार आहे.
गणेशोत्सव काळात कोकणात एसटी बस, खाजगी बस, रेल्वे, खाजगी वाहन आणि यावर्षी पासून विमान सेवा देखील उपलब्ध आहे. कोकणातून कामानिमित्त परगावी गेलेले चाकरमानी न चुकता गणेशोत्सवानिमित्त गावी येतात. आपल्या लाडक्या बाप्पाची मोठ्या भक्तिभावाने सेवा करतात. कोकणातील महत्वाचा आणि सर्वात मोठा गणेशोत्सव सण कोकणी माणूस मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा करतो.
महत्वाच्या बातम्या :
- Nashik News : नाशिकमध्ये पुन्हा धोकादायक वाडा कोसळला, रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांवर वाड्याची भिंत पडली!
- Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका सुद्धा लांबणीवर, राज्य सरकारचा आदेश
- Maharashtra Cabinet Meeting : MMRDA च्या विकासकामांसाठी 60 हजार कोटींचे कर्ज उभारणार; राज्य सरकारचा निर्णय