एक्स्प्लोर

Congress  : राज्यात काँग्रेसची पडझड, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; नाना पटोलेंचा दिल्लीत तळ

Maharashtra Congress  : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला असला तरी अजूनही पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी हालचाल सुरू नसल्याचं दिसतंय. 

मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीचा दारून पराभव झाल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांना  सुरुवात झालेली आहे. या पराभवाला ईव्हीएम जसं जबाबदार आहे तसं राज्यातील पक्षाचं नेतृत्वही जबाबदार असल्याची टीका करत त्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी होताना पाहायला मिळतेय. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत.

काँग्रेस... स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं देशावरती राज्य करणारा पक्ष. मात्र या पक्षाला  उतरती कळा लागलीय. देशात भाजपच सरकार आल्यानंतर अनेक राज्य हातातून जाऊ लागली आहेत. सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्र काँग्रेसला मात्र चांगलाच धक्का या निवडणुकीत बसलाय. एवढा धक्का बसलाय की मोदी लाटेत ही एवढी वाईट अवस्था या पक्षाची झाली नव्हती. मात्र आता आरोपांच्या एकमेकांवर फैरी झाडतान नेते पाहायला मिळत आहे. 

या लाटेमध्ये जागा वाटपावरती ही अनेक नेत्यांनी बोट ठेवलेलं आहे. प्रत्येक मोठ्या नेत्याने आपला जिल्हा, आपलं घर सोडलं तर बाकीचा विचार केला नाही असा आरोपही भाई जगतापांनी यावेळी केला. राज्यात आणि मुंबईमध्ये ज्या पारंपरिक काँग्रेसच्या जागा आहेत त्या जागा मित्र पक्षांना वाटल्या गेल्या त्यामुळेही पक्षाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे कधी इतिहास लिहिला जाईल तर हा काळा इतिहास म्हणून नोंद घेतली जाईल असा त्रागाही भाई जगताप यांनी केला.

सन 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाठ असतानाही पक्षाची एवढी पडझड झाली नव्हती. एवढंच नाही तर पहिल्या फळीतल्या अनेक नेत्यांचाही यावेळी मोठा दारुण पराभव झालाय. मुख्यमंत्री पदाचे दावेदार बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण सोबतच यशोमती ठाकूर यांचा ही पराभव झालाय.

निवडणुकीचा निकाल हातात येऊन दोन दिवस झालेत. मात्र अद्यापही या निवडणुकीची कारणमिमांसा काँग्रेसने केलेली नाही. याऊलट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे नाना पटोले आणि राहुल गांधी यांच्या बैठकीत काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं राहील. झालेल्या निवडणुकीचा निकाल स्वीकारून काँग्रेस पुन्हा कामाला लागणार की पक्षांतर्गत काही फेरबदल करणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget