Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 153 कोरोना रुग्णांची नोंद तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 943 वर
Maharashtra Corona Update : मंगळवारी राज्यात 153 रुग्णांचे निदान तर 135 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) चढ उतार होताना दिसत आहे. मंगळवारी राज्यात 153 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 943 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 135 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज चार कोरोना रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज चार कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,28, 297 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 8,00,82, 006 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 943 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 943 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 549 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात 215, ठाण्यात 77 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
गेल्या 24 तासात देशात 2 हजार 380 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
देशात कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 2 हजार 380 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 2 हजार 67 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला होती. आज या रुग्णसंख्येत किंचीत वाढ झाली आहे. दरम्यान, देशात आत्तापर्यंत 4 कोटी 30 लाख 49 हजार 974 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 22 हजार 062 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तस सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 433 आहे. गेल्या 24 तासांत 1,093 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.76 टक्के आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
