एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच, शुक्रवारी राज्यात 3 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले  

Maharashtra Corona Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

Maharashtra Corona Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सक्रिय रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासांत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर दिवसभरात 1323 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 77,43,513 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.96% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने - 
सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 329 इतकी झाली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सक्रिय रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या नऊ हजार १९१ इतकी झाली आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी सत्तर टक्के सक्रिय रुग्ण एकट्या मुंबईत आहे. ठाणे २१५७, ठाणे ८८४, पालघर ३१४, रायहज ४११ सक्रिय रुग्ण आहेत. 

मुंबईने राज्याची चिंता वाढली -
आज राज्यात ३०८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,०४,७०९ झाली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्याच्या तुलने मुंबईत जवळपास सत्तर टक्के रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शुक्रवारी तब्बल १९५६ दैनंदिन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर ठाणे मनपा २२२, नवी मुंबई मनपा २०१, पुणे मनपा १३५ रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

देशाची सक्रिय रुग्णांची संख्या 36 हजारांवर - 
कोरोनाची संभाव्य चौथी लाट लवकरच धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशात गुरुवारी दिवसभरात 7584 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली यासारख्या राज्यांमध्ये कोरोना चांगलाच फोफावताना दिसत आहे. महाराष्ट्रत दिवसागणिक मोठी रुग्णवाढ पाहता राज्य सरकारने पुन्हा एकदा बंदिस्त जागी मास्क सक्ती लागू करत नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 36 हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या 36 हजार 267 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर रुग्ण सकारात्मकता दर 0.08 टक्क्यांवर पोहोचला आहे. गुरुवारी दिवसभरात 3791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 44 हजार 92 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget