एक्स्प्लोर

Maharashtra Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची मात्र तयारी पूर्ण

महाराष्ट्रात कोरोना (Corona) रूग्णांची वाढती संख्या पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local body election) निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने मात्र या निवडणुकांसाठी तयारी पूर्ण केली आहे

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Election) निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. परंतु, कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेमुळे या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच ओबीसी आरक्षणाशिवाय (Obc Reservation) निवडणुका नको अशी राज्य सरकारने भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने तसा ठरावही विधिमंडळात पास केला आहे. 

महापालिका आणि जिल्हा परिषदांमधील जागांच्या संख्येत वाढ झाल्याने वॉर्ड रचनेचे काम निवडणूक आयोगाने सुरू केले असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचबरोबर सुधारित आराखड्यानुसार आरक्षण निश्चितीसाठी प्रक्रियाही सुरू केली आहे. 
 
एकीकडे निवडणुका पुढे ढकलण्यावरून राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरू असताना निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केलेली आहे. त्यामुळे या निवडणुकांचे नक्की काय होणार हे येत्या काही दिवसांत पाहायला मिळणार आहे. 

राज्यात सध्या कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. वाढत चाललेला कोरोना रुग्णांचा आकडा लक्षात घेता राज्य सरकारकडून या निवडणुका पुढे ढकलण्याची तयारी केली जात आहे. 
 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत 2020 मध्ये राज्य सरकारने नवी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, वसई-विरार आणि कल्याण-डोंबवली या महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. आता मार्च 2022 मध्ये मुदत संपत असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, उल्हासनगर, अमरावती, सोलापूर, अकोला या दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळातील कोरोना रूग्णांच्या आकडेवारीवरून या निवडणुकांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9:00AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 29 June 2024 : ABP MajhaPune Tanker Accident :  पुण्यात अल्पवयीन मुलाकडून पुन्हा अपघात; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM:   29 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
Horoscope Today 29 June 2024 : आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget