एक्स्प्लोर

Guidelines for Omicron : ईयर एन्डिंगच्या नियमावलीसाठी सरकारचं 'वेट ॲन्ड वॉच'!

ईअर एन्डिंगच्या नियमावलीसाठी सरकारचं वेट ॲण्ड वाॅच. पर्यटकांनी निर्बंध पाळावे, पर्यटन संचालक मिलिंद बोरिकराचं आवाहन

Guidelines for Omicron : 2021 वर्षाच्या अखेरीस अनेक लोक घराबाहेर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडतात. त्यात 25 ते 31 डिसेंबरला पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी जातात. पण अशानं पुन्हा रुग्ण संख्या वाढू शकते. तसेच पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढलं तर त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.  त्यामुळे ठाकरे सरकार या काही दिवसात निर्बंध कठोर करणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.

पर्यटकांनी निर्बंध पाळले तर कुठेही अडचण येणार नाही

राज्य शासानानं आणि स्थानिक प्रशासनानं घातलेले निर्बंधाचं पालन केलं तर पर्यटन सुरु राहिल. वर्षाअखेरीस राज्यात पर्यटन मोठ्या प्रमाणात होत असतं. सध्या रुग्णांची संख्या नियंत्रित आहे. पर्यटकांनी निर्बंध पाळले तर कुठेही अडचण येणार नाही, असे मिलिंद बोरिकर, संचालक, पर्यटन यांनी सांगितलं आहे. 

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील काही बाबींवरील निर्बंध कठोर केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील आठ दिवसांत त्यावर निर्णय होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र आता हे 2021 वर्ष संपण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यात या सरकारचा प्लॅन काय आहे वाचा.

ओमायक्रॉनचा धोका पाहता लवकर निर्णय 

सध्या राज्यभरात ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे, त्याचे गुणधर्म समजून घेऊन आगामी आठ-दहा दिवसांत निर्बंधांबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.त्यानुसार आता येत्या कॅबिनेट बैठकित, हे आघाडी सरकार राज्यात नवीन नियम बनवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

अजित पवार काय म्हणाले?

परदेशातून आलेल्या ज्या प्रवाशांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यांच्या घरातील लहान मुलांनाही संसर्ग झाला आहे. त्यामुळेच केंद्र सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेनं त्याबद्दलची स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज आहे. "गेल्या दोन तीन दिवसांमध्ये राज्यातील काही राजकीय लोकांच्या घरात विवाह सोहळे पार पडले. या सोहळ्यांमध्ये मोठी गर्दी जमली होती. हा ओमायक्रॉनचा विषाणू फार वेगाने पसरत असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणूनच देशपातळीवरुन सर्व राज्य, नागरिकांना यासंबंधीचं चित्र स्पष्ट करणं गरजेचं आहे. ओमायक्रॉनबद्दल देशपातळीवर निर्णय झाल्यास सर्व राज्यही त्यांच्या पातळीवर पुढील पावले उचलतील, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, बैठकीनंतर निर्णय

कोरोना व्हायरसचा  नवीन Omicron व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. राज्यातही ओमायक्रॉन व्हेरियंटचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागही अलर्ट झाला आहे. अशातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांनी राज्यातील ओमायक्रॉन परिस्थिती संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यातच सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि टास्क फोर्स  यांच्यामध्ये ओमायक्रॉन संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्स यांच्यात आज रात्री होणाऱ्या बैठकीत ओमायक्रॉन आणि प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा केली जाईल, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

नार्वेकरांच्या 'त्या' ट्वीटचं फडणवीसांकडून समर्थन; राणे म्हणाले, नार्वेकर म्हणजे आत्ताचे शिवसेनाप्रमुख का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला  विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pooja Khedkar Case : वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरांच्या प्रशिक्षणाला ब्रेकABP Majha Headlines : 06 PM : 16 Jully 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPandharpur : कर्नाटकातील संत दानेश्वर महाराजांकडून अन्नदान, भाविकांसाठी नाश्ता, भोजनाची सेवाChhatrapati Sambhajinagar Crime  : समृद्धी महामार्गावर हातात पिस्तुल घेऊन रिल बनवणं भोवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला  विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
Narayan Rane : जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
Embed widget