Raj Thackeray Live Speech : ज्या मशिदीवर भोंगे लागतील, त्यासमोर हनुमान चालीसा लावू : राज ठाकरे
Raj Thackeray Gudi Padwa sabha : आजच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार, राज ठाकरे कोणती घोषणा करणार याकडे लक्ष लागलं आहे.

Background
मुंबई : दोन वर्षांनंतर मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. याच मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येतेय. 9 मार्चला मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, तो 2 एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं होतं. शिवाय या मेळाव्याचा एक टीझरही मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आलाय. त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार, राज ठाकरे कोणती घोषणा करणार याकडे लक्ष लागलंय.
राज ठाकरे यांनी 9 मार्च रोजी पुण्यात झालेल्या मनसेच्या सोळाव्या वर्धापनदिनी बोलताना आजचं भाषण केवळ ट्रेलर आहे, 2 एप्रिलला शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात पूर्ण पिक्चर असेल, असं म्हटलं होतं. त्यानंतरच राज ठाकरेंच्या आज पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आज गुढीपाडवा आहे. या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळवा होणार आहे. सभेला संपूर्ण राज्यातून मनसैनिकांना उपस्थित राहण्याचे आदेश पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात दिले होते. त्यामुळे आज प्रचंड गर्दी शिवाजी पार्कात होण्याची शक्यता आहे. यासाठी तयारी देखील जोरदार सुरु आहे.
राज्यात सत्ताधारी पक्षांकडून काहीच काम होत नाहीत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना संपवण्याचे कारस्थान करत आहेत. यामध्ये सामान्य जनता मात्र मनसेकडून मदत मागत असल्याचं मत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत मत व्यक्त केलं आणि आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात मनसेच एक सक्षम पर्याय असू शकेल, असा विश्वास सर्वसामान्यांना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला, अशी टीका सर्वच स्तरातून होऊ लागली. हीच बाब लक्षात घेत 23 जानेवारीच्या सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्वाची कास पकडली आणि राज्यातील हिंदुत्वाची पोकळी भरण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये सेनेची जागा खाली झाल्यानंतर ती जागा घेण्याचा प्रयत्न अजूनही म्हणावा तसा मनसेकडून पाहायला मिळत नाही. याबाबत देखील आज राज ठाकरे बोलू शकतात अशी शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.
Raj Thackeray on mosque : ज्या मशिदीवर भोंगे लागतील, त्यासमोर हनुमान चालीसा लावू : राज ठाकरे
Raj Thackeray on mosque : प्रार्थनेला माझा विरोध नाही. मशिदीवर लागलेले भोंगे खाली उतरावावे, हा निर्णय सरकारने घ्यावा. निर्णय नाही घेतला तर मशिदीसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावावे. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे.
Raj Thackeray on MLA Free House : आमदारांना फुकट घरे कशाला? त्यापेक्षा पोलिसांना घरे द्या : राज ठाकरे
Raj Thackeray on MLA Free House : मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये वाढ झाली आहे. आमदारांना फुकट घरे कशाला दिली पाहिजे. त्यापेक्षा पोलिसांना घरे दिली पाहिजे. आमदार, खासदारांची पेन्शन बंद केली पाहिजे. मनसेच्या आमदाराने या गोष्टीला पहिला विरोध केला























