एक्स्प्लोर

Dharavi Redevelopment Project : धारावी होणार सिंगापूर! पुनर्विकासासाठी अदानी समूहाचा नेमका प्लान काय?

Dharavi Redevelopment Project : धारावीच्या पुनर्विकासासाठी अदानी समूहाने आता कंबर कसली आहे. पुनर्विकास प्रकल्पासाठी जागतिक पातळीवरील कंपन्या सहभागी होणार आहे.

Dharavi Redevelopment Project : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी (Dharavi) पुनर्विकासाचे कंत्राट ( Redevelopment Project) अदानी समूहाला (Adani Group) मिळाले आहे. अदानी समूहाच्या धारावी रिडेव्हलेपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडून (DRPL) पुनर्विकासाचे नियोजन आणि रचनेच्या कामासाठी जागतिक पातळीवरील तज्ज्ञांची नेमणूक करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने अमेरिकेतील Sasaki, ब्रिटनमधील कन्सल्टेन्सी फर्म Buro Happold आणि आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. Sasaki आणि  Buro Happold या कंपन्या शहर नगरचना आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्या आहेत. त्याशिवाय, सिंगापूरमधील तज्ज्ञ लोकांची एक टीमदेखील प्रोजेक्ट टीमसोबत आहे. 

नोव्हेंबर 2022 मध्ये अदानी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी अदानी प्रॉपर्टीज धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सर्वात मोठी बोली लावली होती. डीआरपीपीएलमध्ये अदानी समूहाची 80 टक्के आणि महाराष्ट्र सरकारची 20 टक्के भागिदारी आहे. अदानी समूहाने 5069 कोटी रुपयांची बोली लावली होती. 

धारावीचा परिसर हा जवळपास 600 एकर जमिनीवर फैलावला असून आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या धारावीत विविध प्रकारचे लघुद्योगही सुरू आहेत. 

Sasaki कंपनीला 70 वर्षांचा अनुभव आहे.  तर Buro Happold कंपनीला क्रिएटीव्ह आणि मूल्यवान पायाभूत सुविधांसाठी ओळखले जाते. त्याचप्रमाणे, हाफीज कॉन्ट्रॅक्टर हे  मुंबईतील गृहनिर्माण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांसाठी ओळखले जातात. 

डीआरपीपीएलच्या प्रवक्त्याने सांगितले की, धारावी पुनर्विकास प्रकल्प ही केवळ पुनर्विकास योजना नाही. धारावीत राहणाऱ्या लोकांची गुणवत्ता सुधारणे हा आमचा उद्देश आहे. यामध्ये आम्ही कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. या प्रकल्पासाठी सिंगापूर प्रेरणादायी ठरेल. 1960 च्या दशकात सिंगापूरची परिस्थिती आजच्या धारावीसारखी होती. पण आज सिंगापूर हे संपूर्ण जगासमोर उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले. 

पुनर्विकास प्रकल्पासाठी चार वेळेस निविदा

धारावीचा कायापालट करण्यासाठी साल 2004 मध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आखणी करण्यात आली. सुमारे 557 एकर भूखंडावर उभ्या असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी साल 2009 ते 2018 दरम्यान, तीन वेळा निविदा काढण्यात आल्या. मात्र या ना त्या कारणांमुळे त्या रद्द करण्यात आल्या. पुनर्विकास प्रकल्पानं (डीआरपी) 2022 मध्ये चौथ्यांदा निविदा काढली आणि यात अदानी समूहानं बाजी मारली. आता राज्य सरकारनं अदानी समुहाच्या निविदेला मान्यता देऊन पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करण्याच्या कामाचा मार्ग मोकळा केला आहे. परंतु यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सत्ताधारी महायुती गळता इतर सर्वपक्षांनी धारावी पुनर्विकासावर आक्षेप घेत मोर्चा काढला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget