Devendra Fadnavis : तुम्ही मला संपवू शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य नैराश्येतून, फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कालचे भाषण हे निराशेचं भाषण होतं. त्यांनी नैराश्येतून वक्तव्य केलं असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कालचे भाषण हे निराशेचं भाषण होतं. त्यांनी नैराश्येतून वक्तव्य केलं असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. तुम्ही आमच्यासोबत निवडणूक लढवून आमच्याच पाठित खंजीर खुपसला, तुमच्यात हिंमत होती तर त्यावेळीच तुम्ही का राजीनामे दिले नाहीत? असा सवाल फडणवीस यांनी केला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अडीच वर्षात मला ते संपवू शकले नाहीत. यापुढेही तुम्ही मला संपवू शकणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.
अडीच वर्षात तुम्ही मला संपवू शकले नाहीत...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गटप्रमुखांच्या मेळाव्यात भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी काल केलेलं भाषण निराशाजनक होतं असे फडणवीसांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत निवडून आला नव्हता, तुम्ही आमच्यासोबत मोदीजींचा फोटो लावून निवडणूक लढवली होती असेही ते म्हणाले. आम्ही लिगली निवडून आलो आहोत. मात्र, तुम्ही आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे फडणवीस म्हणाले. तेव्हा का राजीनामे दिले नाहीत असा सवाला त्यांनी केला. उद्धव ठाकरे असेही म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांची शेवटची निवडणूक आहे. मी त्यांना एवढेच सांगतो की 'मुद्दई लाख बुरा चाहे, तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है' तुम्ही 2019 मध्ये ही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस एनसीपी आणि शिवसेना तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अडीच वर्षात मला संपवू शकले नाहीत. यापुढेही तुम्ही मला संपवू शकणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.
NIA च्या कारवाईवर बोलणं योग्य नाही
राज्यात सुरु असलेल्या एनआयएच्या छापेमारीबाबत देखील फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, लवकरच याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळेल. जी काही छापेमारी सुरू आहे ती कॉर्डीनेटेड स्वरुपाची ॲक्शन आहे. त्या ॲक्शनवर आता बोलणं योग्य नाही, योग्य वेळी मी बोलेल असे फडणवीस यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
हिमंत असेल तर महिनाभरात महानगरपालिकेच्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका घेऊन दाखवा असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. तसेच देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक आहे. तर आपली ही पहिली निवडणूक आहे, असं समजून निवडणुकांना सामोरं जा असे वक्तव्यही त्यांनी केलं होतं. मुंबईवर सध्या गिधाड फिरत आहेत. लचके तोडणारी औलाद फिरत असल्याचा घणाघात त्यांनी केला होता. अमित शहा यांनाही उद्धव ठाकरे यांनी ललकारताना तुम्ही जमीन दाखवाच आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू, असे जाहीर आव्हान दिलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या:
- Shivsena Melawa : 'फोटोग्राफी माझा विषय असूनही, आम्ही पेंग्विन आणल्यावर नाटकं केली नाहीत' : उद्धव ठाकरे
- Uddhav Thackeray : मुलं पळवणारी टोळी ऐकली, पण बाप पळवणाऱ्यांची औलाद महाराष्ट्रात फिरतेय,दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार: उद्धव ठाकरे