एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : शरद पवार, उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणुक; चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात 

भाजप सत्तेत आले नाही तर आपली डाळ शिजनार नाही, किंबहुना ही निवडणूक शरद पवार, उद्धव ठाकरे यांची शेवटची ठरेल या भीतीतून सुप्रिया सुळे बोलत असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय. 

Maharashtra Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात चांगल्याच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. 'शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही', अशी टॅगलाईन देत सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) पक्षाच्या प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होण्याची आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी टॅगलाईनच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत सौम्य भूमिका घेण्याचा आग्रह धरलाय, तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करु नये, असे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यासमवेत सुप्रिया सुळेंची बैठक पार पडली. या बैठकीत सुळेंनी पुढील रणनितीबाबत प्रवक्त्यांना मार्गदर्शन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या. 

दरम्यान, याच मुद्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, आणि मविआवर घणाघाती टीका केली आहे.   खरं राजकारण आता समोर आलंय. सरकारमधील एकनाथ शिंदे चालतात, पण देवेंद्रजी से खैर नाहीं याचा अर्थ काय तो कळतो. एकनाथ शिंदे प्रामाणिक कार्यकर्ता आणि मुख्यमंत्री  आहेत. पण स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी सुप्रिया सुळे देवेंद्रजींना टार्गेट करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या जवळ कुणी येईल का? याचा प्रयत्न त्या करत आहेत. मात्र देवेंद्रजी 14 कोटी जनतेच्या मनात आहेत. देवेंद्रजी आणि भाजप सत्तेत आले नाही तर आपली डाळ शिजनार नाही, आपला जातीयवाद चालणार नाही, किंबहुना ही निवडणूक शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शेवटची ठरेल या भीतीतून सुप्रिया सुळे बोलत असल्याची टीकाही बावनकुळे यांनी केलीय. 

काँग्रेसची जुनी कॅसेट महाराष्ट्रात  चालणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे

राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन पुन्हा तोंडाच्या वाफा फेकल्या. अनेक टीका केल्या. मात्र, मध्यप्रदेशात मुख्यमंत्री असताना कमलनाथ यांनी छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला, त्याचं उत्तर राहुल गांधी हे देतील का? नेहरूंच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या उल्लेखबाबत, छत्रपतींच्या वंशजांच्या पुरावे मागणाऱ्यांवबत, राहुल गांधी का बोलले नाहीत? शिवाजी महाराजांच्या बद्दलचे बेगडी प्रेम काल दिसून आले. काँग्रेसला निवडून द्या खटाखट 8 हजार देऊ म्हणाले, पण दिले नाहीत.  त्यासाठी त्यांनी काल माफी मागायला पाहिजे होती. राज्य शासनाने महिला भगिनींना सन्मान दिला, म्हणून खोटारडेपणा सुरू आहे. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची (Congress) ही जुनी कॅसेट चालणार नाही, अशी घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी केली आहे.   

52 टक्के विदेशी गुंतवणूक आली, त्यावर राहुल गांधी, सकाळचा भोंगा बोलला नाही

संविधानासोबत आता जातीनिहाय जनागणानेचा कांगावा केला जातोय. राज्यात 52 टक्के विदेशी गुंतवणूक आली, त्यावर राहुल गांधी किंवा सकाळचा भोंगा बोलला नाही. काँग्रेस नेते लाडकी बहीण विरोधात कोर्टात गेले. कर्नाटकात काँग्रेस सरकारच्या काळात महिला योजना बंद झाली, त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. शरद पवार म्हणाले होते महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, राहुल गांधी महाराष्ट्रात अराजकता पसरविण्यासाठी आले आहेत. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

हे ही वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
Embed widget