एक्स्प्लोर

औरंगाबादच्या कीर्तनकार बाबाचा 'तसला' व्हिडीओ व्हायरल; महिलेनं घेतलं विष, वारकरी संप्रदायाकडून कारवाईची मागणी

Aurangabad Kirtankar Maharaj Porn Video Viral :वैजापूर तालुक्यातील 48 वर्षीय महाराज आणि सिल्लोड तालुक्यातील 40 वर्षीय महिला कीर्तनकार या अश्लील व्हिडिओ क्लिपमध्ये नको त्या अवस्थेमध्ये दिसून येत आहेत.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात चर्चा आहे ती महिला आणि पुरुष कीर्तनकाराच्या अश्लील व्हिडिओची. जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका महिला आणि पुरुष कीर्तनकाराचा शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतानाचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एका महिलेसोबत हे कीर्तनकार नको त्या अवस्थेत दिसत असून, याच्या दोन व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. विशेष म्हणजे व्हायरल झालेल्या कीर्तनकार महाराजांची जिल्ह्यात प्रतिष्ठीत कीर्तनकार म्हणून ओळख आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय संघटनेकडून या कीर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

गेली अनेक वर्षे पंचक्रोशीत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले वैजापूर तालुक्यातील 48 वर्षीय महाराज आणि सिल्लोड तालुक्यातील चाळीस वर्षीय महिला कीर्तनकार या अश्लील व्हिडिओ क्लिपमध्ये नको त्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. चित्रफितीमध्ये दिसत असलेल्या महाराजांना एक मुलगा देखील आहे. सदरील व्हिडिओ हा महाराजांनी चित्रित केल्याचंही या चित्रफितीमध्ये पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचे दोन व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात.

सदरील व्हिडीओ क्लिप मध्ये दिसणारी महिला हीदेखील महाराज आहे ती ज्या परिसरात राहते त्या परिसरात अनेक लोक तिला मानतात. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. तर दोघांचे यु ट्यूबवर मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत. मात्र त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला आहे. 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला कीर्तनकारानं घेतलं विष
सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे आपली बदनामी होत असल्याचं लक्षात येताच सदरील महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सदरील महिला वर औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे पुरुष किर्तनकारानंही काही टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून महाराजांवर त्यांचे नातेवाईक लक्ष ठेवून आहेत.

कारवाईची मागणी

या कीर्तनकार महाराजांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडीओमध्ये असलेल्या कीर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, व्हिडीओमधील दोघेही "आनंद सांप्रदायिक" असून,  त्याच विचारसरणीला मानून त्यांनी समाजामध्ये किर्तनकार म्हणून ख्याती मिळवली आहे. आपल्या किर्तनातून भक्ती व समाजप्रबोधन करत असल्यामुळे लाखो लोक त्यांना धार्मिक क्षेत्रात आपले आदर्श मानतात. बरेच वारकरीही त्यांना आपले आदर्श मानतात आणि आपापल्या परिसरात त्यांचे किर्तनाचेही आयोजन करतात. मात्र या दोघांनीही त्या लाखो श्रध्दाळू लोकांच्या धार्मिक भावनांवर खूप मोठा आघात केला आहे. महाराष्ट्रातील लोकांची आस्था आपल्या असभ्य वर्तणुकीचे अश्लिल प्रदर्शन करून त्यांनी ती आस्था पायदळी तुडविली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Embed widget