Amravati News : फिनले मिलवरून दोन आमदारामध्ये श्रेयवादाची लढाई; पालकमंत्र्यासमोर बच्चू कडू अन् रवी राणांमध्ये खडाजंगी
Amravati News : फिनेले मिलवरुन अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात नवा वादंग उठला आहे. या मिलवरून प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

Amravati News अमरावती : अमरावती जिल्ह्याची एक वेगळी ओळख म्हणून अमरावती शहराला टेक्स्टाईल झोन म्हणून घोषित केलंय. त्यासाठी कापूस ते कापड या प्रक्रिया उद्योगात विदर्भात महत्त्वाचे स्थान निर्माण करणारी अचलपूर (Achalpur) येथील फिनले मिल (Finlay Mill) देखील सुरू केली. मात्र अमरावतीचा केंद्रातील मोठा उद्योग असलेली हीच फिनले मिल उद्योग गेल्या कित्येक वर्षापासून बंद पडला आहे. हा फिनले मिल उद्योग किमान 800 ते 900 स्थानिक लोकांना रोजगार देतो. हा एवढा प्रमुख फिनले मिल उद्योग का बंद पडला आणि तो नेमकं केव्हा सुरू होईल, याच साऱ्यांना एक कोडंच होतं. या मिलसाठी अनेकांनी शासनदरबारी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. फिनले मिलसाठी राज्य सरकारने 20 कोटी रुपये मंजूर केल्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.
अमरावतीकरांसाठी ही दिलासादायक बातमी असताना आता याच फिनेले मिलवरुन जिल्ह्याच्या राजकारणात नवा वादंग उठला आहे. या मिलवरून प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून त्याचे पडसाद आज अमरावती जिल्हा नियोजन बैठकित उमटल्याचे देखील बघायला मिळाले आहे.
पालकमंत्र्यासमोर बच्चू कडू अन् रवी राणांमध्ये खडाजंगी
अमरावती जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार बच्चू कडू, आमदार यशोमती ठाकूर, आमदार रवी राणासह इतर अनेक पक्षाचे नेते आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते. नुकतीच मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल संदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान, फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बैठकी दरम्यान फिनले मिल सुरू करण्यात येत असलेल्या अडचणी अधोरेखीत करून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मिल कामगारांच्या मागण्यांसंदर्भात माहिती देण्यात आली होती. त्या अनुषंगाने आजच्या जिल्हा नियोजन बैठकीत या विषय चर्चेत येताच आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात श्रेयवादावरून चांगलीच खडाजंगी रंगल्याचे बघायला मिळाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच ही खडाजंगी रंगल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. फिनले मिलसाठी राज्य सरकारने 20 कोटी रुपये मंजूर केले. त्यावरून आमदार रवी राणा यांनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांना टोला लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
