Ajit Pawar : मी दुधाचा धंदा करणारा माणूस, आजही माझा गोठा - अजित पवार
Ajit Pawar : मी दुधाचा धंदा करणारा माणूस आहे. आजही माझा गोठा आहे. पहिल्या 10 गाईंना 5 खोंडं आणि 10 कालवड व्हायची पण आपण नवीन तंत्रज्ञान आणून 10 च्या 10 कालवडी होऊ शकतात असं तंत्रज्ञान विकसित केले आहे.
Ajit Pawar : मी दुधाचा धंदा करणारा माणूस आहे. आजही माझा गोठा आहे. पहिल्या 10 गाईंना 5 खोंडं आणि 10 कालवड व्हायची पण आपण नवीन तंत्रज्ञान आणून 10 च्या 10 कालवडी होऊ शकतात असं तंत्रज्ञान विकसित केले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दुधात काही ठिकाणी युरिया टाकतात, साखर टाकतात, दुधात साखर टाकली की डिग्री वाढते. मागे आम्ही कायदा केला होता भेसळ केली तर त्याला फाशीची शिक्षा द्यावी असली मागणी केली. तेव्हा तो कायदा विचार पूर्वक केला. परंतु त्यावर राष्ट्रपतीनी त्यावर सही केली नाही. मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्यावर कडक कारवाई केली पाहिजे, ही आमची भूमिका आहे, असे अजित पवार म्हणाले.
राजकीय भूमिका वेगळी असू शकते. प्रत्येकाला विचार स्वतंत्र आहे. कधी तरी कुणीतरी काय तरी बोलते त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होतं ते होता कामा नये. वाढपी जवळचा असेल तर आपल्या जवळच्या लोकांना जास्त देतो. मी राज्यातील सर्वच भागात वाढणार आहे. परंतु जेव्हा बारामती आणि निंबूचा विषय येईल तेव्हा एखादी पळी जास्त वाढेल. अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी, कामागरझ महिला, विद्यार्थी यांना डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला, असे अजित पवार म्हणाले. जिल्ह्यातील बिबट सफारीच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळणार आहे. जुन्नर आणि बारामती तालुक्यात बिबट सफारीचा प्रकल्प होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत एका कार्यक्रमात दिली. जुन्नरचे बिबट प्रकल्प बारामतील जाणार यावरून राजकारण सुरू झालं होतं. परंतु अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे या चर्चेला पूर्ण विराम मिळणार आहे.
आता गाडी घसरायला लागली आहे आता थांबतो -
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दत्ता मामा राज्यमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यासाठी चांगला निधी आणलाय आहे.. त्यांना आम्ही विनंती करत असतो की आमच्या तालुक्याला पण निधी द्या. तुम्ही फक्त इंदापूर तालुक्याचे राज्यमंत्री नाही आहात.. बांधकाम विभागाच्या चाव्या तुझ्या हातात आहेत परंतु त्यांना कुठं माहिती आहे की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. जे मी तिजोरी उघडली नाही तर त्यांना काय मिळणार घंटा.. आता गाडी घसरायला लागली आहे आता थांबतो अस म्हणत अजित पवारांनी सावरून घेतलं. अँटिलिया स्फोटक प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले सचिन वाझे सध्या कारागृहात आहेत. याच वाझेंबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक वक्तव्य केलंय. पूर्वी काही झालं की बोफोर्स बोफोर्स करायचे, आता काही झालं की वाझे वाझे करतात असेही अजित पवारांनी म्हटलंय..