Exclusive : कोरोनाची तिसरी लाट येणार नाही कारण... पाहा काय म्हणतायेत डॉ. रवी गोडसे
भारतातील कोरोनाची स्थिती, वाढणारी ओमायक्रॉनची संख्या, 15 ते 18 वयोगटातील मुलांना सुरू केलेले लसीकरण याबाबत एबीपी माझाने डॉ. रवी गोडसे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडलेत.
Dr. Ravi Godse : भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही कारण रुग्णसंख्या वाढली तरी हॉस्पिटलाइजेशन वाढणार नाही. हॉस्पिटलाइजेशन वाढते तेव्हाच कोरोनाची लाट येते असे वक्तव्य डॉ. रवी गोडसे यांनी केले. कारण बऱ्याच जणांना जरी कोरोना किंवा ओमायक्रॉनची लागण झाली तरी त्यांना लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांनी टेस्टींग करुच नये, असा सल्ला देखील यावेळी डॉ. गोडसे यांनी दिला आहे. जर आपण लोकांना आयसोलेट करत गेलो तर एका महिन्यात पूर्ण देशच बंद पडेल असेही ते म्हणाले. तसेच भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याबद्दल त्यांनी सरकारचे अभिनंदनही केले. त्याचबरोबर आणखी लसीकरणावर भर देण्याचा सल्ला देखील रवी गोडसे यांनी दिला आहे.
सध्याची भारतातील कोरोनाची स्थिती, वाढणारी ओमायक्रॉनची संख्या, 15 ते 18 वयोगटातील मुलांना सुरू केलेले लसीकरण याबाबत एबीपी माझाने डॉ. रवी गोडसे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी लसीकरण खूप महत्वाचे असल्याचे सांगितले. ज्या लोकांनी 2 लस घेतल्या आहेत, त्यांना ओमायक्रॉनने सीरीयस होण्याचा धोका 60 टक्क्यांनी कमी असतो. तर ज्यांनी 3 डोस घेतले आहेत, त्यांना 81 टक्क्यांनी धोका कमी असतो. ओमायक्रॉने झाल्यामुळे हॉस्पीटलमध्ये पोहोचण्याची शक्यता 81 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तुम्ही रुग्णालयातच नाही गेले तर तुम्हाला काय फरक पडतो. त्यामुळे हॉस्पीटलमध्ये जाऊन उगीच बेड्स अडवू नका असे गोडसे यावेळी म्हणाले.
अनेक लोकांना म्हणजे जवळपास 80 टक्के लोकांना लक्षणेच नाहीत. म्हणजे ते रुग्ण झाले का? सामान्य माणूस आणि रुग्ण यात फरक आहे. ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांचे टेस्ट करु नका असे गोडसे म्हणाले. जर तुम्ही टेस्ट केली आणि तुमचा रिपोट्र पॉझिटीव्ह आला तर तुम्हाला लक्षणे नसताना हॉस्पीटलमध्ये जाऊ नका. घरातच ओयसोलेट व्हा. अमेरिकेत अशा लोकांना 5 दिवसानंतर कामावर जाण्याची परवानगी दिल्याचे गोडसे म्हणाले. फक्त मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.
ओमायक्रॉन झाला तर डेल्टापासून संरक्षण
जरी ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत असली तरी ते रुग्ण नाहीत. कारण त्यांना लक्षणेच जणवत नाहीत. त्यामुळे धोका कमी आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टा यामधील फरक सांगताना गोडसे यांनी एक उदाहरण दिले. ते म्हणाले की, ओमायक्रॉन हा पाकीटमार आहे आणि डेल्टा हा दरोडेखोर आहे. तुमच्याकडे पाकीटचे नसेल तर दरोडेखोर तुम्हाला कशाला पकडेल. ओमायक्रॉन झाला तर तो डेल्टापासून संरक्षण करेल असे अभ्यासात समोर आल्याचे यावेळी गोडसे यांनी सांगितले. ओमायक्रॉन हा खूप मामूली आहे. यामध्ये रुग्णालयात जाणे आवश्यक नसते. घाबरुन प्रतिकारशक्ती कमी होऊ देखील ओमायक्रॉन होऊ शकतो. त्यामुळे लोकांना घाबरु नये असे गोडसे म्हणाले.
दक्षिण आफ्रिकेतील स्थिती पूर्वपदावर
ओमायक्रॉनला सुरूवात दक्षिण आफ्रिकेतून झाली होती. तिथे आता काहीच नाही. सगळे मोकळे झाले आहे. तेथील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. तेथील निर्बंध उठवले आहेत. आफ्रिकेची आणि आपली तुलना होऊच शकत नाही. कारण आपला देश त्यांच्या खूप पुढे आहे. खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशात लसीकरण झाले आहे. ही चांगली बाब आहे. आणखी लसीकरण वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात अद्यापही 40 टक्के लोकांनी लस घेतली नसल्याचे गोडसे यांनी सांगितले.
लस दोन गोष्टीपासून वाचवू शकते
लसीचे दोन डोस घेतलेल्यांना देखील कोरोनाची किंवा ओमायक्रॉनची लागण झाली आहे, असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यांनी सांगितले की, लस तुम्हाला दोन गोष्टीपासून वाचवते एक कोरोना होऊ नये म्हणून, दुसरी गोष्ट पेशंट सीरीयस होऊ नये यापासून, त्यामुळे लसीकरण गरजेचे असल्याचे गोडसे यांनी सांगितले.
ट्रीटमेंटची व्यवस्था करा
तिसरी लाट येणार असे सांगितले जात आहे, पण मी म्हणतो तिसरी लाट येणार नाही. तुम्हाला जर वाटतेय ना केसेस वाढणार तर त्याच्यासाठीची ट्रीटमेट सुरू करा. त्यासाठी तीन औषधे महत्त्वाची आहे. यामध्ये पॅक्स्लोव्हीड (Paxlovid) हे औषध खूप महत्त्वाचे आहे. अमेरिकेत हे औषध 89 टक्के प्रभावी असल्याचे अभ्यासात सांगितले आहे. तसेच दुसरे औषध हे सोट्रोव्हीमॅब (Sotrovimab) आमि तिसरे एव्हीशील्ड ही तीम औषधे भारतात आणखी असे गोडसे यांनी सांगितले. उगीच तिसरी लाट येमार म्हणून लोकांना घाबरवू नका असे गोडसे यांनी सांगितले. बुस्टर डोस दिल्याने ओमायक्रॉन होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. तो डोस देण्यास आपण उशीर केला हे खरे आहे. सध्या वाटत आहे गरज आहे तर द्यायला सुरूवात करावी. सरकारने कशाला वाट बघायला नको आहे. कोट्यावधी लोकांना लस देणे ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले.
सरकारने 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरण सुरू केले ही चांगली गोष्ट आहे. मुलांना कोरोनाचा धोका कमी असतो. मात्र, 1 डिसेंबरला शाळा सुरू होणार होत्या तर मग लसीकरण 3 जानेवारीला का सुरू केले असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे लसीकरण करण्यासाठी वेळ घालवू नये असे डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: