एक्स्प्लोर

Amol Kolhe : छत्रपती संभाजी महाराज..धर्मवीर की स्वराज्य रक्षक? वाचा खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले...

Amol Kolhe On Ajit Pawar Statement Chhatrapati Sambhaji Maharaj : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज एक व्हिडीओ प्रसिद्ध करून छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते की स्वराज्यरक्षक होते याबाबतची माहिती दिलीय.

मुंबई : अलीकडील अनेक इतिहासकारांनी संभाजी महाराजांना (Chhatrapati Sambhaji) धर्मवीर म्हंटलं. परंतु, त्याचवेळी दुसरीकडे त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना ज्यावेळी कैद करण्यात आले त्यावेळच्या शेवटच्या काळ अलिकडील इतिहासकारांनी ग्राह्य धरला आणि त्यांना धर्मवीर ठवलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षकच होते, अशी माहिती खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिली आहे. 

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षकच होते असे म्हटले. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. राज्यभरात अजित पवार यांच्याविरोधात आंदोलने देखील केली. याच पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी आज एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून त्या व्हिडीओतून त्यांनी अनेक गोष्टींबाबत स्पष्ट सांगितले आहे. 

"चिटणीसांच्या बखरीत अनेक गोष्टी रंगवण्यात आल्या आहे. परंतु, संभाजी महाराजांना जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या कटकऱ्यांना त्यांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते. त्यामध्ये मल्हार रामराव चिटणीसांचा पणजोबा म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस आणि आजोबा बाळाजी यांना देखील हत्तीच्या पायी देले होते. त्यामुळे हा राग मल्हारराव चिटणीसांच्या बखरीत आला असावा. त्यानंतर अनेक इतिहासकारांनी त्याच बकरीचा संदर्भ घेतला आणि मग संभाजीराजे हे धर्मवीर होते अशी कवी कल्पना समोर आली, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.    

Amol Kolhe On Ajit Pawar Statement Chhatrapati Sambhaji Maharaj  : संभाजी महाराजांनी जबरदस्तीने 

"इतिहासाकडे केवळ अभिनिवेशातून पाहण्यापेक्षा तर्कशुद्ध बुद्धीने पाहणं गरजेचं आहे. इतिहासातून काय प्रेरणा मिळतात ते पाहणं फार गरजेचं आहे.  छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनेकांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. 'बुधभूषणम' ग्रंथातून संभाजी महाराजांनी धर्माची फार चिकित्सा केलेली आहे. त्यावर त्यांनी काही श्लोक रचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक फार महत्वाचा दंडक घालून दिला होता. तो म्हणजे माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे. लोकल्याण हे स्वराज्याचं धेय होतं. त्यावेळी धर्मांतर झालेल्या अनेक लोकांना शिवाजी महाराज यांनी शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतलं होतं. संभाजी महाराजांनी देखील तोच कित्ता गिरवत छत्रपती पद धारण केल्यानंतर त्यांनी जबरदस्थीने धर्मांतर घडवण्यावर बंदी आणली होती, अशी माहिती अमोल कोल्हे यांनी या व्हिडीओतून दिली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी इतिहासाचे अनेक दाखले देखील दिले आहेत. 

Amol Kolhe On Ajit Pawar Statement Chhatrapati Sambhaji Maharaj  : 'औरंजेबाने संभाजीराजांना दोनच प्रश्न विचारले'

अमोल कोल्हे म्हणाले, "अनेकांचं म्हणणं आहे की, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं म्हणून त्यांना धर्मवीर ही उपाधी लागली. परंतु, या गोष्टीचा आपण चिकित्सक पद्धतीने विचार केला तर तत्कालीन पुराव्यानुसार औरंजेब बादशाहाने शंभुराजांना दग्याने कैद केल्यानंतर त्यांना दोन प्रश्न विचारले की स्वराज्यातील खजिना कोठे आहे आणि आमच्याकडचे तुम्हाला कोण कोण सामील आहेत? खाफी खान, इश्वरदास नागर, भिमसेन सक्सेना आणि साकी मुस्तेद खान चारही इतिहासकारांनी याबाबत लिहून ठेवलं आहे. त्यामुळं जबरदस्तीने संभाजीराजांनी धर्मांतर करण्यास नकार दिला याला कोणताही आधार नाही. यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे औरंगजेब बादशाह आणि संभाजीराजे यांच्यातील धर्मयुद्ध नव्हते. कारण औरंगजेब याने आदिलशाही नेस्तनाबूत केली, कुतुबशाहीन नेस्तनाबूत केली, स्वत:च्या वडिलांना हाल-हाल करून मारलं, स्वत:च्या भावांची कत्तल केली. त्यामुळे ते धर्मयुद्ध नसून ते सत्ता वर्चस्वाची लढाई होती. त्याच औरंगजेबाला संभाजी महाराजांनी नऊ वर्षे फरफटवलं होतं. त्यामुळं हे धर्मयुद्ध होत नाही. 

पाहा व्हिडीओ 

महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली, बारामतीतच दादांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, भाजप आक्रमक 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
Sharad Pawar : राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
बीडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीत केवळ भाजपला विरोध, शरद पवारांची रणनीती
बीडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीत केवळ भाजपला विरोध, शरद पवारांची रणनीती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Phaltan Doctor : 'महाराष्ट्राच्या लेकीला न्याय द्या', Sule, Sonawane आता Amit Shah यांना भेटणार
Phaltan Doctor : 'पिडीतेचं चारित्र्यहनन का?' Sushma Andhare यांचा Rupali Chakankar यांना सवाल
Language Row: हिंदी सक्तीला विरोध कायम, राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
Vote Jihad Row: 'महाराष्ट्रामध्ये मतचोरी की वोट जिहाद?', BJP नेते Amit Satam यांचा गंभीर आरोप
Voter List Row: दुबार मतदारांवरून राजकारण तापलं, शेलार-देशपांडेंमध्ये जुंपली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
Sharad Pawar : राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
बीडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीत केवळ भाजपला विरोध, शरद पवारांची रणनीती
बीडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीत केवळ भाजपला विरोध, शरद पवारांची रणनीती
Avinash Jadhav on Prakash Surve: अशा अवलादी आमच्या मराठी माणसांच्या नाहीत; 'मराठी माझी आई, मेली तरी चालेल' म्हणणाऱ्या प्रकाश सुर्वेंवर अविनाश जाधव भडकले
अशा अवलादी आमच्या मराठी माणसांच्या नाहीत; 'मराठी माझी आई, मेली तरी चालेल' म्हणणाऱ्या प्रकाश सुर्वेंवर अविनाश जाधव भडकले
Rising Stars Asia Cup 2025: राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा; IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, पाहा 15 खेळाडूंची यादी
राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा; IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, पाहा 15 खेळाडूंची यादी
नाद करतो काय...  बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसांचा वर्षाव; 2 फॉर्च्यूनर, 2 थार, 7 टॅक्टर्स अन् 150 दुचाकी देणार
नाद करतो काय... बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसांचा वर्षाव; 2 फॉर्च्यूनर, 2 थार, 7 टॅक्टर्स अन् 150 दुचाकी देणार
मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार
मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार
Embed widget