एक्स्प्लोर

Ajit Pawar Amol Kolhe : सकाळी खासदार अपात्रतेच्या पत्रातून नाव वगळलं, दुपारी अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला; कोल्हे म्हणतात...

Amol Kolhe meet Ajit Pawar : शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंत्रालयात राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गटाचे (Sharad Pawar) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मंत्रालयात राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अँटीचेंबरमध्ये भेट झाल्याची माहिती आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही भेट मतदारसंघातील विकासकामाबाबत होती, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

नुकतीच अजित पवार गटाकडून लोकसभेतील खासदारांवर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आला आहे. यामध्ये  खासदार अमोल कोल्हे यांचे नाव वगळण्यात आला आहे.  अमोल कोल्हे यांनी आधीच अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र सादर करत आपला पाठिंबा दर्शवला आहे. 'एबीपी माझा' मिळालेल्या विश्वासनीय सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटाला जरी शपथपत्र दिलं असलं तरी त्यांनी शरद पवार गटाला देखील शपथपत्र देत आपण शरद पवार गटासोबत असल्याचा दावा केला आहे. शरद पवार गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यांना, बैठकांना डॉ. अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली होती. 

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेटीबाबत काय म्हटले?

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा झाली.. मात्र ही भेट फक्त मतदारसंघातील विकास कामांबाबत असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले. तसेच मऊ शरद पवार यांच्या सोबतच आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेली अनेक वर्ष पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, इंद्रायणी मेडीसीटी असेल या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अजितदादांनी महत्त्वाची भूमिका सुरुवातीपासून घेतली आहे.  या प्रकल्पांचा पाठपुरावा आणि इतर प्रकल्पांबाबत चर्चेकरिता ही भेट झाली असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले. 

पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा ही मागणी होणं गरजेचं आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन्ही रेल्वे नेटवर्कला शिरूर मतदारसंघ जोडला जाणार असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले. 

शरद पवार गटातील 4 जणांची खासदारकी रद्द करा, अजित पवार गटाची मागणी

 शरद पवार गटानं (Sharad Pawar Group) अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना अपात्र करा, अशी मागणी करणारं पत्र राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना पत्र लिहून केली आहे. आता यालाच पलटवार म्हणून अजित पवार गटानंही शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात याचिका लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे दाखल केली आहे. 

शरद पवार गटाविरोधात अजित पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार गटानं अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात राज्यसभेच्या सभापतींना एक पत्र लिहिलं. आता यालाच अजित पवार गटाकडून पलटवार करत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राज्यसभेतील शरद पवार, वगळता वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. तर, लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांना वगळून श्रीनिवास पाटील, फैजल मोहम्मद यांचं सदस्यत्व रद्द करण्याची  मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
Mexico Tarrif on India: डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
Dhurandhar Movie: 'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!
'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली

व्हिडीओ

Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
Mexico Tarrif on India: डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
Dhurandhar Movie: 'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!
'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली
India vs South Africa, 2nd T20I: बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल
राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल
Gautam Gambhir On Arshdeep Singh Video Ind vs SA 2nd T20: एकाच षटकांत 7 Wide, गौतम गंभीर संतापला; सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंग समोर येताच...
एकाच षटकांत 7 Wide, गौतम गंभीर संतापला; सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंग समोर येताच...
Weather Update: राज्यातील अनेक शहरं महाबळेश्वरपेक्षा थंड; उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोल्ड वेवचं संकट, तुमच्या भागातील परिस्थिती काय?
राज्यातील अनेक शहरं महाबळेश्वरपेक्षा थंड; उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोल्ड वेवचं संकट, तुमच्या भागातील परिस्थिती काय?
Embed widget