एक्स्प्लोर

अमरावती दंगलीचा कट भाजपच्या अनिल बोंडेंनी रचला; नवाब मलिक यांचा आरोप

Amaravati riots : अमरावतीमध्ये झालेली दंगल हा भाजपने केलेला सुनियोजित कट होता असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला.

Nawab Malik on Amaravati riots : अमरावतीमध्ये झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. अमरावती दंगलीचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी उमटले नाही. त्यासाठी राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले. अमरावतीमधील दंगलीसाठी मुंबईतील आमदाराने पैसे पुरवले असल्याचा धक्कादायक आरोपही मलिक यांनी केला.

काही दिवसांपूर्वी मालेगाव, अमरावती, नांदेड येथे त्रिपुरातील कथित हिंसाचाराप्रकरणी मुस्लिम समुदायाकडून मोर्चे काढण्यात आले. या मोर्चादरम्यान हिंसाचार झाला. या हिंसाचाराच्या विरोधात भाजपने अमरावती बंदचे आवाहन केले. या बंद दरम्यान भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार झाल्याचा आरोप करण्यात येत होता. 

अमरावतीमध्ये झालेला हा हिंसाचार सुनियोजित कट होता. हा कट अनिल बोंडे यांनी आखला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. हिंसाचार घडवून आणण्यासाठी काही तरुणांना पैसे वाटण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही मलिकही यांनी केला. अमरावती येथील हिंसाचार हा दोन गटात झाला नाही. त्याशिवाय या हिंसाचाराचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी उमटले नाही, त्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचे मलिक यांनी म्हटले. मालेगावमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नगरसेवक हा एमआयएमचा असून राष्ट्रवादीचा नसल्याचे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले.

दंगलीसाठी मुंबईतून अमरावतीत पैसे?

अमरावती दंगलीच्या आधी मुंबईतून भाजपच्या आमदाराने अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे पाठवले होते. त्याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून विविध मार्गांचा अवलंब करण्यात आला. मात्र, या सगळ्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर भाजपने दंगलीचे अस्त्र काढले असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला.

अनिल बोंडे यांना अटक

माजी मंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंना अटक करण्यात आली आहे. अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिसांनी डॉ. अनिल बोंडेंवर ही कारवाई केली आहे. दंगल भडकवणे, दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे अशा कलमांतर्गत डॉ. अनिल बोंडेंवर गुन्हे नोंद  करण्यात आले आहेत. 

भाजपकडून पुकारलेल्या बंद दरम्यान झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. डॉ. अनिल बोंडेंच्या नेतृत्वात शनिवारी भाजपनं अमरावतीत आंदोलन केलं होतं. त्यात झालेल्या हिंसेला बोंडे  जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी अनिल बोंडेंना अटक केली आहे

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Nashik Crime News: 10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले
10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget