एक्स्प्लोर
Advertisement
मोठ्या भावांच्या भांडणात आमचं नुकसान : विनायक मेटे
नाशिक : भाजप आणि शिवसेना या दोघा मोठ्या भावांच्या भांडणात आम्हा छोट्या भावांच कायमच नुकसान झालं आहे. आताही युतीने जागावाटपात आम्हाला गृहित धरलं न धरल्यास शिवसंग्राम पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रासप आगामी निवडणुकांत स्वबळावर उमेदवार उभे करेल, असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला आहे.
विविध कार्यक्रमांसाठी नाशिकमध्ये आले असता विनायक मेटे आणि खासदार राजू शेट्टी यांनी एकत्र पत्रकार परिषदही घेतली. जिथे ताकद आहे तिथे स्वबळावर आणि जिथे कमी ताकद आहे तिथे एकत्र येऊन महाआघाडीतील हे तिन्ही पक्ष निवडणूक लढवतील. किती महापालिका आणि किती जिल्हा परिषदांत एकत्रित निवडणूक लढवायची, याचा निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक होणार असल्याचंही मेटे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार : शेट्टी
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनीही स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात सिंहाचा वाटा असूनही त्या प्रमाणात सत्तेत वाटा न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. आगामी काळात पक्ष संघटन अधिक बळकट करून कार्यकर्त्यांची पिढी निर्माण करण्यासाठी स्वतंत्र लढणार असल्याचं शेट्टी यांनी स्पष्ट केलं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement