एक्स्प्लोर
ट्रक चालकांचा 20 जुलैपासून बेमुदत संप
या आंदोलनात महाराष्ट्रातील ट्रक चालक, मालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकही सहभागी होणार आहेत. दरम्यान, हे चक्का जाम आंदोलन झाल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

धुळे : ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने येत्या शुक्रवारी म्हणजे 20 जुलैपासून देशव्यापी बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील ट्रक चालक, मालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकही सहभागी होणार आहेत.
दरम्यान, हे चक्का जाम आंदोलन झाल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आल्याचं उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशनचे धुळे जिल्हा अध्यक्ष मनोहर चौधरी यांनी सांगितलं.
या बेमुदत चक्का जाम आंदोलनाची माहिती धुळे जिल्ह्यातील ट्रक चालक, मालक यांना व्हावी यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
काय आहेत मागण्या?
डिझेल दरवाढ कमी करून सर्व राज्यात समान किंमत ठेवणे आणि त्यात बदल तिमाही असावा
टोलमुक्त भारत संकल्पना राबवावी
थर्ड पार्टी इन्शुरन्स वाढीवर नियंत्रण ठेवणे
आरटीओ, पोलीस आणि सीटीओ यांच्याकडून महामार्गावर होणारी छळवणूक थांबवावी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
