एक्स्प्लोर

Crime : प्रियकरानं विवाहित प्रेयसीला संपवलं; अलिबागमध्ये खळबळ, आरोपी जेरबंद 

Alibaug Raigad Crime Update: हत्येनंतर प्रियकरानं प्रेयसीचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची बाब देखील उघड झाली आहे. दरम्यान या प्रकरणात प्रियकराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

Alibaug Raigad Crime Update: रायगड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रियकराने विवाहित प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आली असून या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येनंतर प्रियकरानं प्रेयसीचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची बाब देखील उघड झाली आहे. दरम्यान या प्रकरणात प्रियकराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

विवाहित महिला गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता

अलिबाग तालुक्यातील नवखार (Alibaug Nakhar) येथे राहणाऱ्या 22 वर्षीय विवाहित महिला गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता होती. यामुळे, मांडवा पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी सकाळच्या सुमारास मुरूड तालुक्यातील गारंबीच्या जंगलालगत असलेल्या रस्त्याच्या कडेला झुडपात एका महिलेचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळून आला होता. 

या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ञांच्या मदतीने तपास करण्यात आला. यावेळी या मृतदेहाच्या अंगावर लाकडाचे ओंडके ठेऊन हा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले. 

तपासादरम्यान अलिबाग तालुक्यातील मांडवा पोलीस ठाण्यात सदर महिला बेपता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून संशयित आरोपी सचिन थळे याच्याकडे चौकशी केली असता त्याने पूनम हिची हत्या केल्याचे कबूल केले. पोलिसांच्या माहितीनुसार  मांडवा येथेच राहणार्‍या सचिनचे त्याच गावातील युवतीशी प्रेमसंबंध होते. काही कारणावरून या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.आरोपीने मनात राग धरून तिला मुरुडला आणून जीवे ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी जंगल भागात मयत महिलेच्या अंगावर लाकडे रचून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असं पोलिसांनी सांगितलं. दोघांमध्ये झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सचिन थळे याला हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुरुड पोलिसांनी  सचिन थळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उप विभागीय पोलीस अधिकारी जयदिश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन गवारे, एएसआय सचिन वाणी, सुरेश वाघमारे, सागर रोहेकर, विलास आंबेतकर, सागर रसाळ यांनी आरोपीला पकडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रातील महापौर आरक्षण जाहीर, कल्याण–डोंबिवलीत सत्तेचा मोठा ट्विस्ट! अनुसूचित जमातीचा महापौर होणार, तर...
Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रातील महापौर आरक्षण जाहीर, कल्याण–डोंबिवलीत सत्तेचा मोठा ट्विस्ट! अनुसूचित जमातीचा महापौर होणार, तर...
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Maharashtra Municipal Corporation Reservation 2026 मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST,...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST,...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम मांडीला मांडी लावून बसणार; सत्तेसाठी दोन्ही पक्षांची एकमेकांना साथ
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम मांडीला मांडी लावून बसणार; सत्तेसाठी दोन्ही पक्षांची एकमेकांना साथ

व्हिडीओ

KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sanjay Raut Shivsena : सत्तास्थापनेसाठी श्रीकांत शिंदेंच्या मनसे नेत्यांसोबत बैठका, राऊत काय म्हणाले?
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रातील महापौर आरक्षण जाहीर, कल्याण–डोंबिवलीत सत्तेचा मोठा ट्विस्ट! अनुसूचित जमातीचा महापौर होणार, तर...
Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रातील महापौर आरक्षण जाहीर, कल्याण–डोंबिवलीत सत्तेचा मोठा ट्विस्ट! अनुसूचित जमातीचा महापौर होणार, तर...
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Maharashtra Municipal Corporation Reservation 2026 मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST,...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST,...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम मांडीला मांडी लावून बसणार; सत्तेसाठी दोन्ही पक्षांची एकमेकांना साथ
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम मांडीला मांडी लावून बसणार; सत्तेसाठी दोन्ही पक्षांची एकमेकांना साथ
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
BJP mayor : पुण्याचा कोण होणार कारभारी? भाजपकडून महापौरपदासाठी प्रबळ दावेदारांची नावं चर्चेत, कोणाला मिळू शकतं पद
पुण्याचा कोण होणार कारभारी? भाजपकडून महापौरपदासाठी प्रबळ दावेदारांची नावं चर्चेत, कोणाला मिळू शकतं पद
Share Market : अखेर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका भूमिकेनं सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांना दिलासा
अखेर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका भूमिकेनं सेन्सेक्स- निफ्टीत तेजी
कल्याण डोंबिवलीत 'स्थानिक' पातळीवर दिलेला पाठिंबा काढून घेण्यास राज ठाकरेंना सांगणार का? उद्धव ठाकरेंना हा प्रकार माहीत होता का, ते बोलणार का? संजय राऊत काय म्हणाले?
कल्याण डोंबिवलीत 'स्थानिक' पातळीवर दिलेला पाठिंबा काढून घेण्यास राज ठाकरेंना सांगणार का? उद्धव ठाकरेंना हा प्रकार माहीत होता का, ते बोलणार का? संजय राऊत काय म्हणाले?
Embed widget