Akola News : नव्यानं बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या एन्ट्रीचा भाग सहा महिन्यातच उखडला; संतप्त नागरिकांचा थेट आंदोलनाचा इशारा
Akola News : अकोला शहरातल्या डाबकी रेल्वे गेटजवळ अवघ्या सहा महिन्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या उड्डाणपूलाच्या सुरवातीलाच रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे.
Akola News अकोला : अकोला शहरातल्या डाबकी रेल्वे गेटजवळील काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आलेल्या उड्डाणपूलाची अवस्था अत्यंत वाईट झालीय. नव्यानेच तयार करण्यात आलेला उड्डाणपूलाच्या सुरुवातीचा म्हणजेच एन्ट्रीचा भाग मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त होऊन रस्ता खचला आहे. त्यामुळ उड्डाण पुलावर वाहने चढत असताना धोकादायक ठरत आहे. यामुळ अनेक छोट्या वाहनांचा अपघात होत आहे.
येत्या 8 दिवसात या पुलाच्या एंट्रीचा भाग दुरुस्ती करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश ढोरे यांनी दिला आहे. दरम्यान, हा उड्डाणपूल अकोला शहर आणि गायगाव, भौरद आणि यासह अनेक गावांना जोडणारा पुल आहे. मात्र अवघ्या सहा महिन्यात या रस्त्याची अशी अवस्था झाल्याने अनेक प्रश्न निर्माण केले जात आहे.
संतप्त नागरिकांचा थेट आंदोलनाचा इशारा
अकोला शहरात नव्याने तयार करण्यात आलेल्या डाबकी रेल्वे गेटजवळील पुलाचे काम नुकतेच काही महिन्यांपूर्वी झालं. शहरातील वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल महत्वपूर्ण ठरत आहे. शिवाय हा उड्डाण पुल अकोला शहर आणि गायगाव, भौरदसह इतर अनेक गावांना जोडतो. मात्र अवघ्या सहा महिन्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या या पुलाच्या सुरवातीलाच रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. या रस्त्याला तडे गेले असून सुरवातीलाच रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
परिणामी येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्याची वेळीच दुरुस्ती करावी अन्यथा मोठे आंदोलन उभारू, असा आक्रमक पवित्रा मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश ढोरे यांनी घेतला आहे. अवघ्या सहा महिन्याआधी तयार करण्यात आलेल्या रस्त्याची जर अशा पद्धतीने दुरावस्था होत असेल तर या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणीही योगेश ढोरे यांनी केली आहे.
राजराजेश्वर मंदिर परिसरात आढळले भुयार सादृश्य बांधकाम
अकोला जिल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. या अनुषंगाने श्री राजराजेश्वर मंदिराच्या मागे लागूनच असलेल्या शिकस्त झालेल्या जुन्या इमारतीला पडण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी या ठिकाणी खोदकाम सुरू असताना एक जून भुयार सादृश्य बांधकाम आढळून आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार हे भुयार सादृश्य बांधकाम दोनशे ते अडीचशे वर्ष जुने असावं असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भुयार सारखी दिसणारी पुरातन इमारत जमिनीमध्ये आढळल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
दोनशे ते अडीचशे वर्ष जुने बांधकाम असल्याचा अंदाज
या भुयार सादृश्य बांधकाममध्ये असलेल्या पुरातन दगडांवर खुप वर्षांपूर्वी जय बजरंग बली, जय भोलेनाथ तसेच जय श्री राम लिहिलेले सुद्धा आढळून आले आहे. या भुयाराच्या आतमध्ये 2 छोटे खोल्या बनल्या असून या मध्ये एका भिंतीवर महादेवची प्रतिमा कोरल्याचे दिसून आले आहे. तसेच आत मध्ये अंधार झाल्यास कंदील लावण्यासाठी छोटे कोरीव काम केलेली भगदाड सुद्धा दिसून आले आहे. मात्र, हे बांधकाम नेमकं कशासाठी तयार करण्यात आले असावे, याचा शोध सध्या घेतला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या