एक्स्प्लोर

Nitin Deshmukh: पंतप्रधान मोदी अन् योगी आदित्यनाथ यांच्या अकोल्यातील सभा रद्द, आमदार देशमुखांनी सांगितलं नेमकं कारण; म्हणाले...

अकोल्यात भाजपचा पराभव होत असल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अणि पंतप्रधान मोदींच्या सभा अकोल्यात रद्द करण्यात आल्या आहे. अशी बोचरी टीका आमदार नितीन देशमुखांनी महायुतीवर केलीय.

Nitin Deshmukh अकोला: अकोल्यात भाजपचा (BJP) पराभव होत असल्याने अकोल्यातील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) अणि पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) सभा रद्द करण्यात आल्या आहेत. अकोला लोकसभेची जागा भाजपनं 'ड गटा'त म्हणजेच 'डेंजर झोन' मध्ये असल्याचं भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत स्पष्ट झाल्याचा दावा, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांनी  (Nitin Deshmukh) केलाय. त्यामुळेच संभाव्य पराभव लक्षात घेता योगी अणि मोदींच्या अकोल्यातल्या सभा रद्द झाल्या असल्याचेही नितीन देशमुखांनी म्हटलय.

अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात महाविकास आघाडीची सभा सुरू आहे. या सभेत काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे महासचिव खासदार मुकूल वासनिक आणि काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकरीही उपस्थित आहे. या सभेदरम्यान बोलताना आमदार नितीन देशमुखांनी महायुतीवर ही बोचरी टीका केलीय.

आपला पराभव दिसत असल्याने सर्व सभा रद्द 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळीची सांगता झालीय. पूर्व विदर्भातील पाच मतदासंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता निकालानंतर ठरणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्पातील निवडणुकांच्या प्रचाराचा आधिक जोर वाढला आहे. विदर्भासह मराठवाड्यातील आठ मतदारसंघात येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षानी आपल्या प्रचाराचा मोर्चा त्या दिशेने वळवला आहे. मात्र, आकोल्यात महायुतीकडून आयोजित करण्यात आलेल्या सभा अचानक रद्द करण्यात आल्या आहेत.

यात उद्या अकोला येथे होणारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचा देखील सहभाग आहे. मात्र या सभा रद्द करण्यामागील नेमके कारण काय, हे महायुतीच्या नेत्यांकडून अद्याप कळू शकलेले नाही. मात्र अचनाक सभा रद्द करण्यात आल्याने भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता विरोधकांकडूनही टीकेची झोड होत असल्याचे चित्र आहे.  

पूर्व नियोजित नेत्यांच्या सभा अचानक रद्द

अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन असलेल्या अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा  प्रकाश आंबेडकर हे वंचितकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीकडून भाजपचे अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने अकोला लोकसभेत तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे भाजपकडून अनुप धोत्रेच्या प्रचारार्थ मोठी ताकद लावली जाण्याची शक्यता होती. यापूर्वी अनुप धोत्रे यांच्या अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर भाजपचे नेते उपस्थित झाले होते.

मात्र, त्यानंतर अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ भाजपकडून कोणताही मोठा नेता अकोला मतदारसंघात आला नाही. अशातच पूर्व नियोजित नेत्यांच्या सभा अचानक रद्द झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. तर दुसरीकडे या सभेवरुन विरोधीबाकावरील नेत्यांनीही टीका करण्याची ही संधी सोडलेली नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget